मुंबई - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. ३ मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कामकाज ठप्प पडलं आहे. अनेक उद्योग आणि कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची सूचना देण्यात आली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांनीही त्यांचे स्वरुप बदलले आहे. पूर्वी या आरएसएसच्या शाखा सार्वजनिक ठिकाणी आयोजित केल्या जात असे.
अलीकडेच आरएसएसकडून सकाळ, दुपार आणि संध्याकाळ होणाऱ्या शाखा रद्द करण्यात आल्या असून कार्यकर्त्यांची ऑनलाईन ई शाखा भरवण्यात येत आहे. या अंतर्गत संघाचे लोक झूम अँपच्या माध्यमातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे एकमेकांशी जोडले जात आहेत. ई शाखांमध्ये कार्यकर्त्यांची कार्यशैली बदलण्यात आली आहे.
विशेष बाब म्हणजे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमुळे प्रत्यक्ष शाखांपेक्षा तीनपटीने लोक एकत्र येत आहेत असं सांगण्यात आलं. संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लॉकडाऊन घोषणेनंतर शाखाप्रमुखांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे एकत्र येण्याचे आदेश दिले. नागपूरचे शाखाप्रमुख राजेश लोया यांनी सांगितल्यानुसार आम्ही इंटरनेटच्या सहाय्याने Zoom App चा वापर करुन शाखांचे आयोजन केले आहे. यामुळे २०-३० लोक एकत्र येतात. सार्वजनिक ठिकाणी शाखा भरवतो त्यावेळी ८ ते १० उपस्थित राहतात. शाखेचा मुख्य उद्देश तोच आहे पण शारीरीक हालचाली होत नाही. त्याऐवजी स्वयंसेवक ३० मिनिटं सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करतात. लॉकडाऊन दरम्यान अडकलेल्या लोकांना सेवा देण्याबाबत चर्चा केली जाते असं ते म्हणाले.
त्याचसोबत या शाखेत येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी वेळेत सूट देण्यात आली आहे. त्यांच्या सोयीनुसार ते सकाळीही शाखेत सहभागी होऊ शकतात. पहिली शाखा पहाटे ६.३० वाजता आयोजित करण्यात येत होती पण आता सकाळी ७.३० वाजता शाखा भरते. यात सहभागी होणारे लोक काही व्यायामानंतर प्रार्थनादेखील करतात. आता हा हायटेक मॉडेल संपूर्ण देशभरात लागू करण्यात येईल. पण हे तात्पुरते असेल कारण लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा आरएसएसच्या शाखा जुन्या स्वरुपात भरवल्या जातील असं राजेश लोया यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
...तर अमेरिकेवर चीन कब्जा करेल; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, परिणाम भोगायला तयार राहा!
सावधान! कोरोना आता 'या' मार्गाने येतोय, सरकारने सुरक्षा वाढवावी; मनसेचं केंद्राला पत्र
उद्धव सरकारचा अजब फतवा; वृत्तपत्र छपाईला परवानगी, पण वितरणावर निर्बंध
मग हे सरकारसुद्धा चांगल्या अधिकाऱ्यांचा राजकीय बळी घेणार का?; मनसेचं मुख्यमंत्र्यांना पत्र
...मग उरलेले ५४ हजार कोटी कोणासाठी ठेवलेत?; भाजपा आमदाराचं शिवसेनेला खुलं चॅलेंज