शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

CoronaVirus News: आता सलून, ब्युटी पार्लर्सदेखील सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार; हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 9:38 PM

ठाकरे सरकारचा निर्णय घेण्याच्या तयारीत; लवकरच नव्या नियमाची अंमलबजावणी होण्याची शक्यता

मुंबई: मोदी सरकारनं लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात विविध दुकानं आणि सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता ठाकरे सरकारनंदेखील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हळूहळू निर्बंध शिथिल करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील सलून आणि ब्युटी पार्लर सुरू करण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू आहे. परवापासून म्हणजेच २९ मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे.राज्य सरकारनं मद्यविक्रीला परवानगी दिली, त्यावेळीच सलून आणि ब्युटी पार्लर सुरू करण्याची मागणी सुरू झाली. मात्र गर्दी होईल म्हणून राज्य सरकारनं याबद्दलचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. मात्र आता २९ मेपासून राज्यातील सलून आणि पार्लर सुरू होण्याची शक्यता आहे. सलून आणि पार्लर्स सुरू करताना चालकांना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेतच सलून आणि पार्लर्स सुरू ठेवण्याची परवानगी असेल. सलून, पार्लर्समध्ये ग्राहकांना थेट येता येणार नाही. त्यांना त्यासाठी अपॉईंटमेंट घ्यावी लागेल. या ठिकाणी केवळ अत्यावश्यक सेवा (हेअर कट, हेअर डाय, वॅक्सिंग, थ्रेंडिंग) उपलब्ध असतील. सलून, पार्लर्समध्ये अत्यावश्यक नसलेल्या सेवा (दाढी, फेशियल, क्लेन्सिंग, ब्लिचिंग आणि त्वचेशी संबंधित इतर सेवा) सुरू करण्याची परवानगी नसेल, अशी नियमावली सरकारकडून घालून दिली जाऊ शकते.सलून, पार्लर्स ५० टक्के क्षमतेनंच चालवली जावीत, असा नियम राज्य सरकारकडून लागू केला जाऊ शकतो. कर्मचारी आणि ग्राहकांसाठी इन्फ्रा रेड थर्मामीटर्सचा वापर करण्यात यावा आणि एखाद्या व्यक्तीमध्ये लक्षणं आढळून आल्यास त्याला प्रवेश देऊ नये. ग्राहक आणि कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करावा. ग्राहकांनी ग्लोव्ह्ज आणि ऍप्रन वापरावं. सलून, पार्लर्सच्या प्रवेशद्वाराजवळ हँड सॅनिटायझर ठेवावं. प्रत्येक वापरानंतर खुर्ची, क्युबिकल्स सॅनिटाईज कराव्यात. ग्राहकांसाठी विल्हेवाट लावण्याजोगं टॉवेल, नॅपकिन वापरावं. विल्हेवाट लावण्याजोगं टॉवेल, नॅपकिन न वापरल्यास प्रत्येक वापरानंतर ते सॅनिटाईज करावं, अशा सूचना शासनाकडून दिल्या जाऊ शकतात.VIDEO: तुमच्यात हिंमत असेल तर सरकार पाडाच; शिवसेनेच्या मंत्र्यांचं भाजपाला थेट आव्हान...अन् जयंत पाटलांनी भागाकार करत फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीचा 'सिलिंडर' फोडला"फडणवीस, एका ट्रेनसाठी ५० लाखांचा खर्च कसा आणि कुठून येतो?; जरा आम्हालाही सांगा"फडणवीस, तुम्हाला मोदींवर भरवसा नाय का? जयंत पाटलांचा माजी मुख्यमंत्र्यांना चिमटाविरोधकांकडून सरकारला बदनाम करायचं काम; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल"काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्येही राहुल गांधींचं ऐकत नाही"

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस