शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

EMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील

By हेमंत बावकर | Published: April 01, 2020 4:32 PM

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ग्राहकांना तीन महिने ईएमआय न भरण्यापासून सूट दिली आहे. या बँकांनी आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी दिलेल्या सूचनांचे पालन केले आहे.

मुंबई : रिझर्व्ह बँकेने लॉकडाऊन आणि कोरोनाच्या संकटामुळे गृह, वाहन आदी कर्जदारांना तीन महिन्यांचा ईएमआय दिलासा देण्यास सांगितले होते. यावर मंगळवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ग्राहकांना तीन महिन्यांचा ईएमआय दिलासा दिला आहे. म्हणजेच तुमच्या कर्जाचा हप्ता घेण्यात येणार नाही. यामुळे कर्जदारांना हायसे वाटू लागले आहे. पण ही बातमी वाचल्यानंतर त्यांची झोपच उडणार आहे. 

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ग्राहकांना तीन महिने ईएमआय न भरण्यापासून सूट दिली आहे. या बँकांनी आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी दिलेल्या सूचनांचे पालन केले आहे. दास यांनी रिटेल आणि कृषी कर्जासह अन्य टर्म लोनचे हप्ते तीन महिने घेऊ नयेत असे आवाहन बँकांना केले होते. आता बँकांनी हे हप्ते मुदतवाढ करून भरण्याची सोय दिली आहे. पंजाब नॅशनल बँक, एसबीआय, बँक ऑफ बड़ोदा, युनिअन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, कॉर्पोरेशन बँक, इंडियन बँक, यूको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आँध्र बँक, इंडियन ओवरसीज बँक, सिंडिकेट बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, अलाहाबाद बँक, बँक ऑफ इंडिया आणि आयडीबीआय बँकांनीही तीन महिने ईएमआय न घेण्याचा निर्णय घेतला आहे. एका दृष्टीने हा गरजवंतांसाठी दिलासा असला तरीही तो आतबट्ट्याचा व्यवहार ठरणार आहे. यामुळे ग्राहकांवर पश्चातापाची वेळ येणार आहे. कसे ते पहा. 

आरबीआयच्या सूचना सर्वात आधी एसबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक अंमलात आणते. पण या बँकेनेच ही माहिती देऊन ईएमआय दिलासा घेऊ इच्छिणाऱ्यांची झोप उडविली आहे. एसबीआयने त्यांच्या वेबसाईटवर एक लिंक दिली आहे. यावर त्यांनी हा ईएमआय दिलासा म्हणजेच न भरण्याची सूट दिल्याचे म्हटले आहे. तसेच ही योजना कशी लागू होईल याबाबतही सांगितले आहे. यामध्ये त्यांनी वाहन आणि गृह कर्ज अशी दोन उदाहरणे दिली आहेत. 

 

  • जर तुम्ही ६ लाखांचे वाहन कर्ज ५४ महिन्यांच्या मुदतीचे घेतले असेल आणि आरबीआयनुसार तीन महिन्यांचा दिलासा घेतला तर तुमच्या कर्जाला मुदतवाढ मिळणार आहे. तसेच या काळातील एकूण कर्जाच्या रकमेवर तब्बल १९००० रुपये व्याज आकरले जाण्याची शक्यता आहे. ही रक्कम तुमच्या कारच्या हप्त्याच्या दीड पट असणार आहे. 
  • जर तुम्ही ३० लाखांचे १५ वर्षांच्या मुदतीचे गृहकर्ज घेतले असेल तर तुम्हाला तीन महिन्यांचे एकून कर्जाच्या रकमेचे व्याजच २.३४ लाख रुपये भरावे लागणार आहे. हे व्याज म्हणजे तुमचे घराचे ८ हप्ते असणार आहे.

एकूणच काय तर तुम्ही तीन हप्ते टाळण्यासाठी किंवा सूट घेण्याचा हव्यास धरलात तर वाहनाचे दीड महिन्याचाच EMI दिलासा मिळणार आहे. तर घराचे कर्ज असलेल्यांना तर तीन महिन्यांचे हप्ते आणि व्याजाचे ८ महिन्यांचे हप्ते असे ११ हप्ते जादा भरावे लागणार आहेत. 

हा  EMI दिलासा कोणी घ्यावा? गणित एकदम सोपे आहे. यामुळे जर गरज असले, तुमची नोकरी, रोजगार गेला असेल तरच EMI दिलाश्याचा लाभ घेणे सोईचे होणार आहे. अन्यथा हा व्यवहार आतबट्ट्याचाच ठरणार आहे. 

फायदे कोणते? ईएमआय दिसासा देण्याचे दोन फायदे आहेत. जर लॉकडाऊन काळात हप्ते भरण्याची ताकद नसेल तर तेवढा दिलासा मिळणार आहे. दुसरा म्हणजे हप्ता चुकला तरीही सिबिल स्कोअरवर त्याची नोंद होणार नाही. हा प्रकार केवळ एसबीआयच नाही तर अन्य बँकांकडूनही केला जाणार आहे. यामुळे जर गरज नसेल तर तीन महिन्यांचा दिलासा न घेणेच परवडणारे आहे. 

EMI ला तीन महिन्यांचा दिलासा म्हणजे नेमके काय? जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकSBIएसबीआयbankबँक