मुंबई - अॅस्ट्राझिनेका (AstraZeneca) आणि ऑक्सफर्ड युनिवर्सिटीकडून विकसित करण्यात आलेल्या कोरोना लसीच्या चाचणीचे सकारात्मक निकाल समोर आले. यात महत्त्वाची बाब म्हणजे अॅस्ट्रा झिनेका (AstraZeneca) ला ही लस तयार करण्यासाठी पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचं सहकार्य मिळालं. या देशी कंपनीचे सीईओ अदार पूनावाला यांनी कंपनी एका आठवडाभरात या लसीची क्लिनिकल चाचणी करण्यासाठी डीजीसीआयकडे अर्ज सादर करेल अशी माहिती दिली आहे.
सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादन करणारी कंपनी आहे. दरवर्षी ही कंपनी १.५ अरब डोस तयार करते. ज्यात पोलिओपासून मीजल्सपर्यंतचा समावेश असतो. ऑक्सफर्ड युनिवर्सिटी आणि अॅस्ट्रा झिनेका (AstraZeneca)ने या भारतीय कंपनीला कोविड १९ लस तयार करण्यासाठी निवडलं. पुण्याच्या या कंपनीने सांगितलं होतं की, ते शेवटचे आदेश मिळण्यापूर्वीच लसीच्या उत्पादनाचं काम सुरु करतील त्यामुळे जेव्हा कधीही सर्व परवानग्या मिळतील तोपर्यंत कोरोना लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन तयार असेल.
सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी सांगितले की, ओक्सफर्ड युनिवर्सिटीच्या चाचणीचे सकारात्मक निकाल आल्याने आम्ही अत्यंत आनंदात आहोत. आम्ही एका आठवडाभरात भारतीय रेग्युलेटरकडे परवान्यासाठी अर्ज करणार आहोत. परवानगी मिळाल्यानंतर आम्ही भारतात या लसीची चाचणी करणार आहोत. त्यासोबतच मोठ्या प्रमाणात लसीचं उत्पादन तयार करण्याची सुरुवात करणार आहोत. याच महिन्यात पूनावाला यांनी त्यांची कंपनी वर्षाच्या अखेरपर्यंत कोविड १९ वर लस बनण्याची अपेक्षा केली होती. कोणतीही घाई न करता गुणवत्तापूर्ण आणि सुरक्षित लस बनवण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे.
१९६६ मध्ये अदर पूनावालाचे वडील सायरस पूनावाला यांनी भारतीय सीरम इन्स्टिट्यूटची स्थापना केली. कंपनीने अमेरिकेची बायोटेक फर्म कोडगेनिक्स, तिचा प्रतिस्पर्धी नोव्हाव्हॅक्स आणि ऑस्ट्रियाच्या थेमिस यांच्याबरोबर तीन महत्त्वाची लस तयार करण्यासाठी भागीदारी केली आहे. पूनावाला म्हणाले की, एसआयआय सुरुवातीला दरमहा ४० ते ५० लाख लस डोस तयार करण्यावर भर देईल, जी वर्षाला ३५ ते ४० कोटीपर्यंत वाढविली जाईल