सिंधुदुर्ग - राज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रात वावरणाऱ्या आणि सतत दौऱ्यांवर असणाऱ्या राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनाही कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्री आणि भाजपाच्या काही आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आता शिवसेनेचे एक आमदारही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार वैभव नाईक यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-मालवण मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या वैभव नाईक यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनामुळे उदभवलेल्या संकटकालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वैभव नाईक हे जिल्ह्यात सातत्याने दौरे करून परिस्थितीवर लक्ष ठेवत होते. दरम्यान, सोमवारी सकाळी त्यांचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. संध्याकाळी त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
दरम्यान, वैभव नाईक यांनी गेल्या काही दिवसांत विविध ठिकाणी दौरे केले होते. त्यामुळे ते अनेकांच्या संपर्कात आले होते. आता वैभव नाईक यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरू आहे. वैभव नाईक हे दोन वेळा विधानसभेवर निवडून गेलेले आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना पराभवाचा धक्का दिला होता.
दरम्यान, राज्यात सोमवारी कोरोनाचे ८ हजार २४० रुग्ण सापडले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख १८ हजार ६९५ झाली असून मृतांचा आकडा १२ हजार ३० झाला आहे. राज्यात १ लाख ३१ हजार ३३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर दुसऱ्या बाजूला राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.९२ टक्के असून आतापर्यंत १ लाख ७५ हजार २९ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल
भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा
महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही
…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान
coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी
गेल्या सहा महिन्यांत कोरोनाबाबत तज्ज्ञांना मिळाली ही महत्त्वाची माहिती, लस आणि हर्ड इम्युनिटीबाबत मिळाले असे संकेत…