मुंबई : लॉकडाऊनमध्ये एसटीची वाहतूक राज्यभर पूर्णपणे थांबवण्यात आल्याने त्या काळात प्रवास करता न आलेल्या प्रवाशांच्या मासिक, त्रैमासिक पासला मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ज्यांना या मासिक, त्रैमासिक पासचा परतावा पाहिजे असेल, त्यांनाही तो देण्याची व्यवस्था एसटी महामंडळाने केल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी मंगळवारी दिली.यासंदर्भात परिपत्रक महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत लागू करण्यात आले आहे. २२ मार्चपासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन होता. त्यामुळे २२ मार्चपूर्वी एसटीने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी मासिक, त्रैमाासिक पास काढले होते. परंतु एसटी बंद असल्याने त्यांना या काळात प्रवास करणे शक्य झाले नाही. त्यांनी जवळच्या आगारात जाऊन आगार प्रमुखांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना, त्यांच्या मासिक, त्रैमासिक पासला मुदतवाढ अथवा त्यांच्या पासचा उर्वरित परतावा रक्कम देण्याची व्यवस्था आगार पातळीवर करण्यात येईल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.रेल्वेच्या पासलाही मुदतवाढलोकलची वाहतूक सामान्य प्रवाशांसाठीसुरळीत सुरु झाल्यावर सर्व रेल्वे प्रवाशांना त्यांच्या वाया गेलेल्या दिवसांसाठी रेल्वेच्या पासचा कालावधीही वाढवून मिळणार आहे.
CoronaVirus News: एसटीच्या पासला मिळणार मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 6:11 AM