मुंबई : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टरांचे टास्क फोर्स तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिले.ठाकरे यांनी विभागीय आयुक्त, पालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. ते म्हणाले, रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आपण चांगल्या पद्धतीने रोखला असला तरी मृत्यूदर वाढणे बरोबर नाही. आपण लॉकडाऊन शिथिल केला आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत काही जिल्ह्यांत वाढ होत आहे. रुग्णांचा शोध घेणे आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क जलद शोधणे हा एकमेव मार्ग आहे. प्रयोगशाळांमधून चाचणीचे अहवाल लगेच मिळायला हवेत, अशा सूचना असताना काही ठिकाणी ७२ तास लागत असतील तर ती गंभीर बाब आहे, याची जाणीव करून देत कोणत्याही परिस्थितीत ढिलाई नको, असे मुख्यमंत्री म्हणाले.
CoronaVirus News: मुंबईच्या धर्तीवर राज्यभर तज्ज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 3:46 AM