शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

दिलासादायक! डेल्टा प्लसचे ते दोन्ही रुग्ण झाले पूर्णपणे बरे, आता त्या गावातील लोकांचे नमुने तपासणी करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 10:39 AM

Coronavirus in Maharashtra: गोंदिया जिल्ह्यातील २० कोरोना बाधित रुग्णांचे नमुने डेल्टा प्लसच्या अनुषंगाने चाचणीसाठी पुणे येथील सीएसआयआर आयजीआयबी प्रयोगशाळेकडे जून महिन्यात पाठविण्यात आले होते.

गोंदिया - कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनांचा एक भाग म्हणून कोरोना विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोमिक सिक्वेंसिंग) नियमित स्वरुपात करण्यात येत आहे. याच अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील २० कोरोना बाधित रुग्णांचे नमुने डेल्टा प्लसच्या अनुषंगाने चाचणीसाठी पुणे येथील सीएसआयआर आयजीआयबी प्रयोगशाळेकडे जून महिन्यात पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल बुधवारी (दि.११) रात्री आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यात दोन रुग्ण डेल्टा प्लसचे आढळले. मात्र हे दोन्ही रुग्ण आता पूर्णपणे बरे झालेले आहे. (They both became patients of Delta Plus completely healed, now will examine samples from the people of that village)

डेल्टा प्लसच्या अनुषंगाने गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेतून कोरोना बाधित रुग्णांपैकी २० रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे नियमित पाठविले जातात. जून महिन्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने पुणे येथील सीएसआयआर आयजीआयबी प्रयोगशाळेकडे २० कोरोना बाधित रुग्णांचे नमुने पाठविले होते. त्याचा अहवाल बुधवारी रात्री प्राप्त झाला. यात दोन रुग्ण डेल्टा प्लसचे आढळले. यापैकी १ रुग्ण सडक अर्जुनी आणि १ रुग्ण सालेकसा तालुक्यातील आहे. अहवाल प्राप्त होण्यास दोन महिन्याचा कालावधी लागला. अहवाल येईपर्यंत हे दोन्ही रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे फारशी काळजी करण्याची गरज नाही. मात्र जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने दोन रुग्णांचा अहवाल डेल्टा प्लसच्या अनुषंगाने पॉझिटिव्ह आल्याने हे रुग्ण आढळलेल्या गावातील सर्वच नागरिकांचे नमुने तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्याच अनुषंगाने या दोन्ही गावात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. या दोन्ही गावामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी लोकमतशी बाेलताना सांगितले.दोन्ही रुग्णांची हिस्ट्री तपासणारडेल्टा प्लसच्या अनुषंगाने पॉझिटिव्ह अहवाल आलेले रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, त्यांच्या प्रवासाचा संदर्भ याची माहिती घेवून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे सुध्दा नमुने घेवून ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.

 एका रुग्णामागे शंभर जणांचे नमुने टेस्ट करणारकाेरोनापेक्षा डेल्टा प्लसचा संसर्ग अधिक वेगाने होत असल्याने या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या शंभर जणांचे नमुने घेवून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच दर वाढविण्यावर सुध्दा भर देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले काेट

कोरोनापेक्षा डेल्टा प्लसचा संसर्गाचा वेग अधिक आहे. सध्या जिल्ह्यात डेल्टा प्लसचा एकही रुग्ण ॲक्टिव्ह नाही. मात्र यानंतरही नागरिकांना पूर्वी इतकी काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन गरजेचे आहे.-डॉ. नितीन कापसे (जिल्हा आरोग्य अधिकारी गोंदिया)

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य