मुंबई: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, महाराष्ट्राला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 97 वर पोहचली आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा धोका टाळ्यासाठी राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र परिस्थिती गंभीर असतानाही लोक लॉकडाऊनची बंधने झुगारून घराबाहेर निघत असल्याचे दिसून येत होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवाहन करूनही लोक काही काम नसताना देखील घराबाहेर निघत होते. त्यांनतर, सोमवारी ५ वाजता उद्धव ठाकरेंनी राज्यात संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचे जाहीर केले. संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी ३१ मार्चपर्यंत असणार आहे. परंतु संचारबंदीच्या दरम्यान जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु राहणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. संचारबंदीच्या या काळात नेमकं काय काय सुरु राहणार आणि काय काय बंद राहणार हे जाणून घ्या.
काय काय सुरु राहणार-
जीवनावश्यक वस्तूंची दुकानंऔषधांची दुकानंदूध आणि दुग्धजन्य पदार्थदवाखाने, रुग्णालयंकिराणाची दुकानंरेल्वेतील मालवाहतूकबँका, शेअर बाजार आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्थावीजपुरवठा आणि पाणीपुरवठा यांसारखी अत्यावश्यक कार्यालयंरिक्षा, टॅक्सी सुरु (प्रवाशांची संख्या मर्यादित)कृषीमालाशी सबंधित वाहतूक
काय काय बंद राहणार-
मुंबईची लोकलसेवाजिल्ह्यांच्या सीमाराज्यातील सीमानागरिकांचा प्रवासशाळा, महाविद्यालयंमॉल, सिनेमागृह, नाट्यगृहधार्मिक प्रार्थना स्थळेखासगी वाहने (अत्यावश्यक कारणांसाठी सुरू राहतील)परदेशातून येणारी वाहतूक
दरम्यान, याआधी कोरोनाचे १५ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या ८९ वर पोहोचली होती. मात्र त्यात सोमवारी आणखी ८ जणांची भर पडली. या आठ जणांमध्ये सांगलीच्या ४, मुंबईच्या ३ आणि साताऱ्याच्या एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९७ वर पोहोचली आहे.