मुंबईः आतापर्यंत १६ लाखांहून अधिक लोकांना रेल्वे आणि बसच्या माध्यमातून परराज्यात सोडलं आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे हे सर्व सांगत असतानाच त्यांनी ट्रेनवरून राजकारण करणाऱ्या पीयूष गोयल यांचे आभारही मानले आहेत. पीयूषजी धन्यवाद, तुम्ही मनावर घेतलं त्यामुळे 11 लाख मजूर ट्रेनने परत आपल्या घरी गेले. मागच्या वेळेस आम्ही बोलल्याने त्यांना राग आला आहे. मात्र, त्यानंतर त्यांनी रेल्वे उपलब्ध करून दिल्याने अनेक मजूर त्यांच्या घरी पोहोचल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. एसटीमधून सव्वापाच लाख मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात आलं, त्यासाठी मुख्यमंत्री निधीतून 85 ते 90 कोटी रुपये खर्च केल्याचंही उद्धव ठाकरेंनी नमूद केलं आहे. सार्वजनिक ठिकाणी मर्यादित वेळेत फिरता येणार आहे. सध्या राज्यात सध्या 77 कोरोना चाचणी प्रयोगशाळा आहेत, येत्या काळात ही संख्या 100 वर नेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. जे घरातून बाहेर पडत आहे, त्यांनी घरात येताना काळजी घ्यावी. कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळल्यानंतर तत्काळ रुग्णालयात भरती व्हा. 34 हजारांपैकी 24 हजार रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाही. महाराष्ट्रात गेले दोन महिने उपचार करण्यावर भर दिला, टास्क फोर्स अविरत मेहनत करत आहे, मृत्यूदर कमी करायचा आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.माझा एक निष्ठावान कार्यकर्ता चाचणीसाठी गेला आणि तिथेच कोसळला, लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. येत्या पावसाळ्यापासून चाचण्यांची क्षमता आणि लॅबची संख्या वाढवावी लागेल, त्याची किंमत कमी करावी लागेल, कारण पावसात भिजून सर्दी-फ्लू होणार आहे. त्यामुळे काळजी घेण्याची आवश्यकता आहे. येत्या काळात आरोग्य, शिक्षण यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. गरज पडल्यास नवीन हॉस्पिटल उभारणे शक्य व्हावे, अशी तयारी ठेवायची असल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
हेही वाचा
Video: पुनश्च हरी ओम... लॉकडाऊनचा कालावधी संपून पूर्वपदावर येण्यास सुरुवातविद्यापीठातील अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत महत्वाचा निर्णय, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणामोठी बातमी! वृत्तपत्र घरपोच पोहोचवण्यास परवानगी; उद्धव ठाकरेंची महत्त्वाची घोषणा