मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे या मंत्र्याने सोमवारीच मंत्रालयामध्ये एका बैठकीला हजेरी लावल्याने खळबळ उडाली आहे.
या मंत्र्याची तब्येत मंगळवारी काहीशी बिघडली होती. यामुळे त्यांच्यावर फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. या मंत्र्याने सोमवारी मंत्रालयात बैठकीला हजेरी लावल्याने त्यांना भेटलेल्या अधिकारी, कार्यकर्त्यांनाही क्वारंटाईन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
रात्री उशिरा त्यांची हॉस्पिटलच्या मुख्य डॉक्टरांनी तपासणी केली असून आज त्याची प्रकृती स्थिर असल्याचे हॉस्पिटलकडून कळविण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यासंबंधी डॉक्टरांशी चर्चा केल्याचे समजत असून प्रकृतीची विचारपूस केली आहे.
आणखी वाचा...
कोरोना एकटा नाहीय! आणखी एक महाभयंकर संकट घेऊन येतोय; संयुक्त राष्ट्राचा इशारा
लॉकडाऊनमुळे नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर; ट्रम्प संकटात
एड्स, स्वाईन फ्ल्यू अमेरिकेतून पसरला; कोणी जबाबदार धरले का? चीनचा सवाल
फेसबुक-Reliance Jioचा 'मेगा प्लॅन'; तीन कोटी दुकानदार, शेतकरी होणार मालामाल
हास्यास्पद! पाकिस्तानात ६० वर्षांचा वृद्ध 'गर्भवती'; खासगी लॅब सील करण्याची वेळ