कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रालाही बसला होता. परंतु आता परिस्थिती नियंत्रणात येताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात १६,५७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये १०,८९१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर १६,५७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या चोवीस तासांत २९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दरही आता ९५.३५ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात सध्या १,६७,९२७ रुग्णांवर उपचार सुरू आहे.
मुंबईत ६७३ नव्या रुग्णांची नोंदमुंबईतही आता कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबईत ६७३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ७५१ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९५ टक्क्यांवर आला आहे. मुंबईत सध्या १५,७०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी आता ५४३ दिवसांवर आला आहे.