कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला होता. परंतु आता नव्या कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आली आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढल्यामुळे मध्यंतरी राज्य सरकारनं काही निर्बंध घातले होते. परंतु आता काही अंशी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. दरम्यान, यानंतर शुक्रवारी राज्यात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत थोडी वाढ झाली होती.परंतु शनिवारी पुन्हा एकदा यात घट झाली आहे. तर मोठ्या प्रमाणात रुग्णांनी कोरोनावरही मात केली आहे.
गेल्या चोवीस तासांत राज्यात १०,६९७ नव्या कोरोनाबाधितांची नोद करण्यात आली. तर ३६० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दुसरीकडे राज्यात गेल्या चोवीस तासांत १४,९१० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना उपचारानंच घरी सोडण्यात आलं आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९५.४८ टक्क्यांवर पोहोचला आहे.
मुंबईत ७३३ नव्या रुग्णांची वाढगेल्या चोवीस तासांत मुंबईत ७३३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे ७३२ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९५ टक्के इतका झाला आहे. मुंबईत सध्या १५,७९८ रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण दुपटीचा कालावधीही आता ६३३ दिवस इतका झाला आहे.