कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबतच साथीशी दोन हात करत दिवसरात्र, रस्त्यारस्त्यावर उभ्या ठाकलेल्या पोलिस दलालाही मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. कोरोनामुळे राज्यभरात आजवर 265 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 126 पोलीस हे मुंबईतील आहेत.
देशात जेव्हा लॉकडाऊनची घोषणा झाली तेव्हापासून पोलीस निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी रस्त्या रस्त्यावर उभे ठाकले होते. या पोलिसांनी अनेकदा नागरिकांच्या रोषालाही बळी पडावे लागले. यातच पोलिसांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची बाधा देखील झाली. दोन लाटा आणि सध्या सुरु असलेली कोरोनाची तिसऱ्या लाटेत हजारो पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. सध्या राज्यभरात 2,145 पोलीस उपचार घेत आहेत.
पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागणकोरोनाचा प्रादुर्भाव सर्वच घटकात वाढत चालला असून, त्याला राज्य पोलीस मुख्यालयही अपवाद राहिलेला नाही. बुधवारी प्रशिक्षण व खास पथक विभागाचे आयजी रवींद्र शेणगावकर याच्यासह सहायक महानिरीक्षक रमेश धुमाळ, शीला साईल हे अधिकारी तसेच वरिष्ठ कार्यालयीन अधीक्षक, स्टेनो व ऑर्डरली यांना मंगळवारी कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले.
१६४ पोलीस झाले नव्याने कोरोनाग्रस्तमुंबई पोलीस दलात बुधवारी नव्याने १६४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ३५ पोलिसांना दुसऱ्यांदा लागण झाली. या सर्वांना सौम्य लक्षणे आहेत. मुंबई पोलीस दलात ७१ जण ४ जानेवारीला कोरोना पॉझिटिव्ह आले होते तर १० व ११ जानेवारीला ही संख्या १२६ व १६४ पर्यंत वाढली. आतापर्यंत एकूण ८८७ पोलीस कोरोनाग्रस्त आहेत. त्यापैकी ६६२ होम क्वारंटाईन आहेत तर १३० जण कोविड सेंटरमध्ये आणि ९५ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामध्ये ओमायक्रोनचा एकही रुग्ण नाही. मुंबई पोलीस दलात ३९,०८९ जणांचा पहिला, तर ३५,७११ जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे.