सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी तिसरी लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत चढउतार होताना दिसत आहे. तर दुसरीकडे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून सरकारही सावधतेनं पावलं उचलताना दिसत आहे. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीमदेखील राबवली आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत राज्यात ४ हजारांपेक्षा अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या चोवीस तासांत राज्यात ४,१७४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे राज्यात ४,१५५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत ६३ लाख ८ हजार ४९१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७.०९ टक्के इतरा झाला आहे. राज्यात सध्या ४७,८८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या चोवीस तासांत राज्यात ६५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.