राज्यातील कोरोनाची लाट सध्या ओसरताना दिसत असली तरी दररोज नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात रुग्णसंख्येनुसार शिथिल करण्यात आलेले निर्बंध कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काहीशा प्रमाणात पुन्हा लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक आहे. परंतु सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याचं दिसून आलं आहे.
गेल्या चोवीस तासांत राज्यात ८,६२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ८,०८५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. राज्यात गेल्या चोवीस तासांत २३१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत राज्यात एकूण ५८,०९५४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यातील मृत्यूदर हा २.०१ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,१३,९८,५०१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,५१,६३३ नमूने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,२१,३७७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,५८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या एकूण १,१७,०९८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.