शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Coronavirus Update : राज्यात चोवीस तासांत ८,७५३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, ८ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2021 10:21 PM

Coronavirus In Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं रुग्णसंख्येत होत आहे चढउतार. रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांवर.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून सातत्यानं रुग्णसंख्येत होत आहे चढउतार.रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांवर.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्यानं चढउतार दिसून येत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात साडेआठ हजारांपेक्षा अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे राज्यात आठ हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

राज्यात गेल्या चोवीस तासांत ८,७५३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ८,३८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये १५६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. राज्यात सध्या १, १६,८७६ सक्रिय रुग्ण असून आता रुग्ण बरे होण्याचा दर ९६.०१ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत ६७६ रुग्णांची नोंदमुंबईत गेल्या चोवीस तासांत ६७६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ५४६ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्के इतका आहे. मुंबईत सध्या ८,५९८ रूग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण दुपटीचा कालावधी ७४४ दिवस इतका झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका