कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसताना दिसला होता. परंतु आता गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं नव्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात २२ हजारांपेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचा दरही ९५ टक्क्यांच्या वर गेला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. गेल्या चोवीस तासांत राज्यात १०,२१९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर २२,०८१ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या १ लाख ७४ हजार ३२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर रुग्ण बरे होण्याचा दरही ९५.२५ टक्क्यांवर पोहोचला असल्याची माहिती टोपे यांनी दिली.
मुंबईतही कोरोनामुक्त रुग्ण अधिकगेल्या चोवीस तासांत मुंबईत ७२८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ९८० रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईत आतापर्यंत ६,७९,२५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत सध्या १५,७८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर रुग्ण बरे होण्याचा दरही आता ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचा कालावधी ५५० दिवसांवर पोहोचला आहे.