शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

CoronaVirus Vaccine: राज्यात 3 कोटी लोकांना लस; पहिल्या टप्प्यासाठी योजना तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 4:36 AM

केंद्र सरकारने यासाठी को-विन हे ॲप तयार केले आहे. सर्व राज्यांकडून त्यासाठीची माहिती मागविली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवा कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस, कोरोनाच्या लढ्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीस आणि ५० पेक्षा जास्त वय असणारे नागरिक यांना लस दिली जाईल.

मुंबई : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस तीन कोटी लोकांना देण्यात येईल. त्यादृष्टीने राज्यभर कोल्ड चेन उभी करण्याचे काम पूर्ण झाले आहे. केंद्राकडून त्यासाठीचे एसएमएस टप्प्याटप्प्याने येतील. त्यानुसार संबंधितांना लस देण्याचे काम पूर्ण होईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.केंद्र सरकारने यासाठी को-विन हे ॲप तयार केले आहे. सर्व राज्यांकडून त्यासाठीची माहिती मागविली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवा कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस, कोरोनाच्या लढ्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीस आणि ५० पेक्षा जास्त वय असणारे नागरिक यांना लस दिली जाईल. त्यासाठीची माहिती गोळा करून ॲपवर अपलोड करणे पूर्ण झाले आहे. येऊ घातलेली लस कशा पद्धतीने द्यायची, त्याची तयारी, आवश्यक प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. मतदान केंद्र रचनेप्रमाणे बूथ तयार करून व्हॅक्सिनेशन केले जाईल, असे टोपे यांनी स्पष्ट केले.सरसकट प्रत्येकाला लस दिली जाणार का? टोपे म्हणाले, ज्यांना प्राधान्याने लस देण्याची गरज आहे, अशांना लस आधी देण्यात येईल. त्यासाठी सगळी माहिती केंद्र सरकारने तयार केलेल्या ॲपवर नोंदवावी लागते.  नोंद झाल्यानंतर संबंधितांना कोणत्या भागात, कोणत्या ठिकाणी लस दिली जाईल याचे मेसेज येतील. ते मेसेज आणि शासनाने मान्य केलेल्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखविल्यानंतर त्यांना लस मिळेल.  कोणीही दबावतंत्राचा वापर करून लस मिळावी यासाठी प्रयत्न करू नये, त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.  शासकीय रुग्णालयांमधून रक्त मोफत दिले जात आहे. रक्ताचा तुटवडा होऊ नये म्हणून केलेल्या आवाहनाला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. ३१ डिसेंबरपर्यंत राज्यातल्या ५०० ब्लड बँक रक्त संकलनाचे काम करण्यासाठी व्यस्त झाल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या