मुंबई- कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे राज्यात अत्यावश्यक सेवावगळता इतर सर्व बंद करण्यात आलं आहे. अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी कोरोनाला रोखण्यासाठी जनजागृती केली आहे. घरात राहून सरकारला सहकार्य करा, असंही आवाहन राजकीय नेते करताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीसुद्धा जनतेला घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. बंधू भगिनींनो कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं काही निर्णय घेतले आहेत. त्या निर्णयांची अतिशय गांभीर्यानं नोंद घेऊन कृती करण्याची आवश्यकता आहे. राज्यात जमावबंदीचा आदेश झालेला आहे. तरीही अनेक ठिकाणी रस्त्यावर लोकांच्या घोळकेच्या घोळके बघायला मिळत आहेत. इतर देशातील परिस्थिती गंभीर झालेली आहे. त्याची गांभीर्यानं नोंद घेऊन वेळीच जी दक्षता घ्यायची आहे, ती त्यांनी घेतलेली आहे. आपणही अशा प्रकारची गांभीर्यानं दक्षता घेण्याची आवश्यकता आहे, असंही शरद पवार म्हणाले आहेत.
Coronavirus: कोरोनाविरुद्धची लढाई आपण जिंकणारच; शरद पवारांना विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 12:10 PM