शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
3
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
4
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
5
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
7
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
8
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
9
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
10
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
11
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
12
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
13
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
14
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
15
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
16
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
17
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
18
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
19
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
20
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

Coronavirus : दहावीचा शेवटचा पेपर होणार की नाही? विद्यार्थी, पालकांची धाकधूक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 3:42 AM

coronavirus : सुरुवातीला नववी व अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्यात येतील आणि भूगोल पेपरचा निर्णय ३१ मार्चनंतर घेण्यात येईल, असे शिक्षणमंत्र्यांकडून घोषित करण्यात आले होते.

मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहावीच्या परीक्षेतील शेवटचा भूगोलाचा पेपर शालेय शिक्षण विभागाकडून ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. ३१ मार्चनंतर याबाबतीत निर्णय घेतला जाणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले असले तरी सोमवारी देशात २१ दिवसांच्या लॉकडाउनच्या घोषणेनंतर या पेपरवर अनिश्चिततेचे सावट पसरल्याने दहावीचे विद्यार्थी व पालकांची धाकधूक वाढली आहे.सुरुवातीला नववी व अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्यात येतील आणि भूगोल पेपरचा निर्णय ३१ मार्चनंतर घेण्यात येईल, असे शिक्षणमंत्र्यांकडून घोषित करण्यात आले होते. मात्र देशभरातील लॉकडाउनच्या घोषणेनंतर या परीक्षा होतील की नाही किंवा घ्याव्यात की नाहीत, असा प्रश्न पालक, विद्यार्थी, शिक्षकांपुढे उभा राहिला आहे. लॉकडाउनच्या घोषणेनंतर सीईटी सेलकडून होणारी १३ ते २३ एप्रिल दरम्यानची परीक्षाही पुढे ढकलण्यात आली. यामुळे दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर होईल की नाही, असा गोंधळ पालकांमध्ये उडाला.पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या मूल्यांकनाच्या सरासरी गुणांवर पुढील वर्गात प्रवेश द्यावा, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. असाच निर्णय दहावीच्या भूगोलाच्या पेपरच्या बाबतीत घेता येईल का, याची चाचपणी शिक्षण विभागाने करावी, असा सूर पालकांमधून येत आहे. शिक्षण विभागाच्या बेजबाबदारपणामुळे आधीच पालक विद्यार्थ्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता हा उरलेला पेपर घ्यायचाच हा हट्ट करण्यात अर्थ नाहीच. याऐवजी योग्य निर्णय घेऊन वेळीच पालक, विद्यार्थ्यांना दिलासा कसा देता येईल याकडे शिक्षण विभागाने लक्ष द्यावे, अशी प्रतिक्रिया हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलचे शिक्षक उदय नरे यांनी दिली आहे.‘विद्यार्थ्यांना वेठीस धरु नये’राज्य शिक्षण मंडळाने ज्या विषयांची परीक्षा झाली आहे, त्याच विषयांचे गुण ग्राह्य धरीत निकाल लावावा, ४० गुणांसाठी पुन्हा विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये, असे मत सह्याद्री, कांदिवली येथे राहणारे पालक मंगेश कळंबे यांनी व्यक्त केले. तर पेपर होईल की नाही याबाबत आम्हाला शंकाच आहे, मात्र आम्ही एका विषयाचाच अभ्यास किती दिवस करत राहायचा, असा सवाल दहावीच्या सुमेध रहाटे याने उपस्थित केला.

टॅग्स :examपरीक्षाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस