मुंबई : देशासह राज्यात कोरोनानं थैमान घातलेलं आहे. राज्यांत रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. आज कोरोनाच्या २९४० नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या राज्यात ३४ हजार ८८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. तर राज्यात आज १०८४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात २८ हजार ८१ रुग्णांची कोरोनातून मुक्तता होऊन त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात ११.३ दिवस होता, तो आता १७.५ दिवस झाला आहे. देशाचा रुग्ण दुपटीचा वेग १७.१ दिवस आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ४३.०७ टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर ३.३७ टक्के आहे. राज्यात ९९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ४७ हजार ६७२ नमुन्यांपैकी ६५ हजार १६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४३ शासकीय आणि ३४ खाजगी अशा ७७ प्रयोगशाळा निदानासाठी कार्यरत असून राज्यातील प्रयोगशाळा चाचण्यांचे प्रमाण प्रति दशलक्ष ३३४९ एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण २५२३ एवढे आहे. सध्या राज्यात ५ लाख ५१ हजार ६६० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ६८१ खाटा उपलब्ध असून सध्या ३५ हजार ४२० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. या कालावधीतील ५९ मृत्यूंमध्ये मुंबई ३५, पनवेल -७, ठाणे -६, वसई विरार – ६, नवी मुंबई -२, कल्याण डोंबिवली -१ जळगाव- १ तर १ मृत्यू यांचा समावेश आहे. राज्यातील जिल्हानिहाय पॉझिटिव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (३८,४४२), बरे झालेले रुग्ण- (१६,३६४), मृत्यू- (१२२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,८४५)
ठाणे: बाधित रुग्ण- (९१२३), बरे झालेले रुग्ण- (२९७३), मृत्यू- (१८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९६८)
पालघर: बाधित रुग्ण- (९६८), बरे झालेले रुग्ण- (३२९), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०९)
रायगड: बाधित रुग्ण- (१०४२), बरे झालेले रुग्ण- (५४९), मृत्यू- (३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५२)
नाशिक: बाधित रुग्ण- (११११), बरे झालेले रुग्ण- (८९३), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५८)
अहमदनगर: बाधित रुग्ण- (१०८), बरे झालेले रुग्ण- (५७), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५)
धुळे: बाधित रुग्ण- (१४०), बरे झालेले रुग्ण- (७१), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३)
जळगाव: बाधित रुग्ण- (६०७), बरे झालेले रुग्ण- (२७२), मृत्यू- (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६३)
नंदूरबार: बाधित रुग्ण- (३४), बरे झालेले रुग्ण- (२०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११)
पुणे: बाधित रुग्ण- (७५३७), बरे झालेले रुग्ण- (३५५९), मृत्यू- (३२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६५८)
सोलापूर: बाधित रुग्ण- (८७२), बरे झालेले रुग्ण- (३५३), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५१)
सातारा: बाधित रुग्ण- (४९०), बरे झालेले रुग्ण- (१४८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२६)
कोल्हापूर: बाधित रुग्ण- (४२९), बरे झालेले रुग्ण- (१०४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२१)
सांगली: बाधित रुग्ण- (११२), बरे झालेले रुग्ण- (५५), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६)
सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (३३), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६)
रत्नागिरी: बाधित रुग्ण- (२४२), बरे झालेले रुग्ण- (९०), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४७)
औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१४६२), बरे झालेले रुग्ण- (९८६), मृत्यू- (६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४११)
जालना: बाधित रुग्ण- (११९), बरे झालेले रुग्ण- (४५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४)
हिंगोली: बाधित रुग्ण- (१४९), बरे झालेले रुग्ण- (९७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२)
परभणी: बाधित रुग्ण- (५७), बरे झालेले रुग्ण- (३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३)
लातूर: बाधित रुग्ण- (११८), बरे झालेले रुग्ण- (५५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०)
उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (१८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८)
बीड: बाधित रुग्ण- (४६), बरे झालेले रुग्ण- (५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (४१)
नांदेड: बाधित रुग्ण- (१०८), बरे झालेले रुग्ण- (८६), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६)
अकोला: बाधित रुग्ण- (५७१), बरे झालेले रुग्ण- (२८९), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५३)
अमरावती: बाधित रुग्ण- (२१३), बरे झालेले रुग्ण- (१२१), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७६)
यवतमाळ: बाधित रुग्ण- (१३०), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८)
बुलढाणा: बाधित रुग्ण- (५८), बरे झालेले रुग्ण- (२९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६)
वाशिम: बाधित रुग्ण- (८), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२)
नागपूर: बाधित रुग्ण- (५५६), बरे झालेले रुग्ण- (३५३), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९३)
वर्धा: बाधित रुग्ण- (११), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०)
भंडारा: बाधित रुग्ण- (२९), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)
गोंदिया: बाधित रुग्ण- (६१), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३)
चंद्रपूर: बाधित रुग्ण- (२५), बरे झालेले रुग्ण- (१५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०)
गडचिरोली: बाधित रुग्ण- (३२), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४)
इतर राज्ये: बाधित रुग्ण- (५९), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४)
एकूण: बाधित रुग्ण-(६५,१६८), बरे झालेले रुग्ण- (२८,०८१), मृत्यू- (२१९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९),ॲक्टिव्ह रुग्ण-(३४,८८१)
हेही वाचा!
Unlock 1: आता प्रवासासाठी ई-पासची गरज नाही; केंद्राने केली घोषणा, राज्याच्या निर्णयाची प्रतीक्षा
Lockdown 5.0 : मुहूर्त ठरला!... पहिल्या टप्प्यात उघडणार धार्मिक स्थळं, मॉल अन् हॉटेल्सचं दार
Lockdown 5.0 : केंद्राची नवीन नियमावली प्रसिद्ध; जाणून घ्या कोणती सूट मिळणार अन् कशावर बंदी
जैन समाजाच्या साधू-साध्वींना प्रवास करण्यास सरकारची परवानगी, पण 'हे' नियम पाळावे लागणार
CoronaVirus: अनर्थ टळला! एअर इंडियाचं विमान आकाशात असतानाच वैमानिक पॉझिटिव्ह निघाला अन्...