शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

Coronavirus:…अन् ‘त्या’ अहवालानं पायाखालची जमीन सरकली; हतबल बापाची फेसबुक पोस्ट व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 14:38 IST

बाप म्हणून जेव्हा आपल्या मुलाला कोरोना झाला आहे ही बाब समजताच त्याच्या पायाखालची जमीन सरकल्याची स्थिती निर्माण झाली.

ठळक मुद्देकोरोनाग्रस्तांच्या आकड्यात वाढ होत असल्याने सरकार चिंतेत कोरोनाच्या दहशतीखाली लोकांना जीवन जगावं लागत आहे.पोटच्या गोळ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर बापाची अवस्था व्यक्त करणारी फेसबुक पोस्ट

अकोला – सध्या जगभरात ५३ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाच्या जाळ्यात ओढलं आहे. तर ३ लाख ४० हजाराहून जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशा या बिकट परिस्थिती कोरोनाच्या दहशतीखाली लोक रोजचं जीवन जगत आहेत. काही ठिकाणी लोक स्वत:च्या घरातले मृतदेह घेऊन जाण्यासही तयार नाहीत. कोरोनामुळे माणसापासून माणूस दूर जात असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

कोरोनाच्या संघर्ष काळात अकोला जिल्हा रुग्णालयातील एका आरोग्य कर्मचाऱ्याची पोस्ट व्हायरल होत आहे. ही पोस्ट वाचून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. बाप म्हणून जेव्हा आपल्या मुलाला कोरोना झाला आहे ही बाब समजताच त्याच्या पायाखालची जमीन सरकल्याची स्थिती निर्माण झाली. या बापाने फेसबुकवर हा अनुभव कथन केला आहे. त्यातून हे वाचताना अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल.

या फेसबुक पोस्टमध्ये वडील लिहितात की, चार दिवसांपूर्वी मुलाला ताप आल्याने बालरोग तज्ज्ञाकडे घेऊन गेलो होतो, त्याच्यासोबत दोन लहान मित्रही होते. हॉस्पिटलमध्ये मुलाला स्वॅप देऊन घरी परतले. मुलाचा ताप कमी झाला तो पुन्हा खेळायला लागला. त्याचे मित्र देखील सोबत खेळायला लागली. दोन दिवसानंतर मी ऑफिसमध्ये कॉम्प्युटरवर कोरोनाचे रिपोर्ट पाहत होतो. त्यावेळी अचानक माझ्या मुलाचा आणि त्याचा दोन्ही मित्रांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं दिसून आले. हा रिपोर्ट पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली, कसंतरी स्वतःला सांभाळत जराही चेहऱ्यावर रडू न येता घरी आलो, घरी आल्या आल्या दोन्ही लहान पोरं विचारत होते रिपोर्टमध्ये काय आहे?

शेवटी जड अंतकरणाने मी सांगितलं, आपल्याला मुलाला कोरोना झाला आहे. हे ऐकून पत्नी आणि मुलगी दोघंही जोरजोरात रडू लागले. आपले अश्रू लपवताना त्यांचे अश्रू थांबवणे कठीण जात होते, बाबा आता काय होणार असा प्रश्न दोघेही लहान मुलं वारंवार विचारत होते. त्यावर आता आपल्या मुलगा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राहणार असं मी सांगितले, मग मुलीने प्रश्‍न केला बाबा मीही त्याच्यासोबत राहते चालेल का तो एवढा लहान आहे एकटा कसा राहील?  मी मात्र निरुत्तर आणि स्तब्ध होतो एकाला वाचवायला दुसऱ्याला अर्पण करायला निघालो होतो परिस्थितीच तशी भीषण होती त्याला पर्याय काहीच नव्हता अशा भीषण परिस्थितीत मुलीने मोठ्या मनाने दोघांची बॅग भरली. माझं मन आणि शरीर दोन्ही गळून गेलेलं होतं पण माझी मुलगी मात्र स्थिर झाली आणि ती तिच्या लहान भावाला समजावत होती की, आता आपल्याला एकटाच राहायचं.

पाहता-पाहता संध्याकाळचे सहा वाजले तोपर्यंत संपूर्ण परिसराला समजून गेलो होतो की, आमच्या घरी पॉझिटिव्ह आले आहेत. काही वेळानंतर १०८ रुग्णवाहिका घराजवळ आली त्यात मुलगा आणि त्याचे दोन मित्र त्यांच्या आई-वडिलांसह माझी मुलगी आणि मुलगा हे बसले आणि रुग्णवाहिका हॉस्पिटलच्या दिशेने रवाना झाली. जन्मल्यापासून ते आतापर्यंत ज्या माय बापाचं बोट कधी सोडलं नाही, त्यांना अलग होऊन कधी झोपलो नाही अशा आई-बाबांना आता सोडून राहायचं म्हणजेच खूप मोठी परीक्षा होती पण माझ्या मुलीने खूप सुंदर प्रकारे परिस्थिती हाताळली. आज दोघं चिमुकले एकटे राहतात. अशा या भीषण परिस्थिती मधून बाहेर येण्याची शक्ती ईश्वर त्यांना देवो हीच प्रार्थना आहे अशा शब्दात वडिलांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

कोरोनापाठोपाठ पाकिस्तानातून भारतात आलं मोठं संकट; संपूर्ण उत्तर प्रदेशात अलर्ट जारी

केंद्रीय रेल्वेमंत्री आणि राज्य सरकार वाद शिगेला; रात्री २ वाजता ट्विट करत पियूष गोयल म्हणाले...

उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय; स्थलांतरित कामगारांना परत बोलवायचं असेल तर...

कोरोनावरील लस सर्वप्रथम कोणाला मिळणार?; केंद्र सरकारने आखला ‘असा’ प्लॅन!

जाणून घ्या, ४८ तासांनंतर बदलणार अमेरिकेचा इतिहास; नासा पुन्हा सुरु करणार ‘मानव मिशन’!

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस