शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

महिला अत्याचाराच्या प्रश्नावरून राज्यपाल-मुख्यमंत्री यांच्यात पत्रसंघर्ष; कोश्यारी यांच्या सूचनेला ठाकरेंचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 6:28 AM

साकीनाका येथील बलात्काराच्या अमानुष घटनेनंतर भाजप महिला आघाडीचे एक शिष्टमंडळ राज्यपाल कोश्यारी यांना भेटले होते व राज्यातील महिलांवरील वाढत्या त्याचारासंदर्भात निवेदनही दिले होते. 

मुंबई : राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार यांच्यातील संघर्षाची धार अधिक तीव्र होत असतानाच आता त्यात एका पत्रसंघर्षाची भर पडली आहे. मुंबईत साकीनाका येथे महिलेवर झालेला बलात्कार, तिचा मृत्यू आणि महिलांची सुरक्षितता यावर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन बोलवावे अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे. त्यावर, हा विषय साकीनाक्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी आहे. देशातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावे, अशी मागणी आपण पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करावी, असे जोरदार प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्राद्वारे दिले आहे. (Correspondence between the Governor and the Chief Minister on the issue of atrocities against women; Thackeray's reply to Koshyari's suggestion)

साकीनाका येथील बलात्काराच्या अमानुष घटनेनंतर भाजप महिला आघाडीचे एक शिष्टमंडळ राज्यपाल कोश्यारी यांना भेटले होते व राज्यातील महिलांवरील वाढत्या त्याचारासंदर्भात निवेदनही दिले होते. 

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रासोबत या निवेदनाची प्रत जोडली असून त्यात राज्यातील अलिकडच्या महिला अत्याचाराच्या घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. आपल्याला भेटलेल्या शिष्टमंडळांमधील महिलांच्या मनात एकूण महिला वर्गाविषयी असुरक्षिततेची भावना दिसून आली, तसेच महिला आमदारांनीही याकडे लक्ष वेधले होते, असे नमूद करून राज्यपालांनी या पत्रात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली.

सरकार सरकारचे काम करीत आहे. त्यामुळे आता विधिमंडळाचे खास अधिवेशन बोलावून चर्चा घडविण्याची आपली सूचना नवा वाद निर्माण करू शकते, सरकारविरोधी लोकांची विशेष अधिवेशनाची मागणी सुरू असताना राज्यपालांनी त्याच सुरांत सूर मिसळून तीच मागणी करणे हे संसदीय लोकशाही पद्धतीस मारक आहे.     - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील मुद्दे...- गुजरातमध्ये बलात्काराच्या रोज तीन घटना घडतात. यावर चर्चा करायची झाल्यास गुजरात विधानसभेचे एक महिन्याचे विशेष अधिवेशनच बोलावावे लागेल.

- जगात दिल्लीची ‘बलात्काराची राजधानी’ अशी नाचक्की झाली आहे. उत्तर प्रदेशातील बलात्काराच्या नृशंस घटना सतत घडत असतात. 

- भाजपशासित ‘रामराज्या’त महिला खरोखरच सुरक्षित आहेत काय? गुजरात मॉडेलमध्ये महिला खरेच सुरक्षित आहेत काय?

- आपण मुख्यमंत्री होतात त्या उत्तराखंडमध्ये महिला अत्याचार दीडशे टक्क्यांनी वाढले, तिथे काय उपाययोजना करावी?

- जम्मू-कश्मीरमधील पंडितांच्या माय-भगिनींना नराधमांच्या अत्याचाराचे शिकार व्हावे लागले. त्यांच्यावरील अत्याचार तालिबान्यांना लाजविणारे आहेत, पण जम्मू-कश्मिरात भाजपचे सरकार असताना या प्रश्नी ना विशेष अधिवेशन बोलावले ना कधी चर्चा केली. 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीUddhav Thackerayउद्धव ठाकरेChief Ministerमुख्यमंत्रीMolestationविनयभंगWomenमहिला