शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
3
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
4
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
5
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
6
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
7
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
8
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
9
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
10
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
11
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
12
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
13
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
14
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
15
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
16
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
17
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
18
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
19
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
20
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का

भ्रष्ट नेत्यांना जेलची हवा खावीच लागणार; दानवेंचे पवारांवर शरसंधान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 6:28 PM

काँग्रेसचे सरकार असताना शरद पवार, अजित पवार यांनी राज्य सहकारी बँकेच्या निधीचा गैरवापर केला.

जळगाव जामोद : काँग्रेसचे सरकार असताना शरद पवार, अजित पवार यांनी राज्य सहकारी बँकेच्या निधीचा गैरवापर केला. नियमबाह्य कर्ज उचलले. साखर कारखाने तोट्यात आणले. ते विक्रीसाठी काढले आणि तेच कारखाने याच बँकेचे पुन्हा कर्ज घेवून विकत घेतले. हा गैरव्यवहार पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना समोर आला. मग अशा नेत्यांवर ईडीची कारवाई झाली तर त्यामध्ये सध्याचा सरकारचा काय दोष. भाजपा सरकार हे सूडबुद्धीने ईडीची कारवाई करीत आहे. असा कांगावा साफ खोटा आहे. जे कराल ते भरावंच लागेल, असे सांगत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शरद पवारांवर शरसंधान साधले. 

    गुरुवारी जळगाव जामोद येथे भाजपाच्या पेज प्रमुख मेळाव्यात बोलत होते. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना तुरुंगात भेटण्यासाठी सोनिया गांधी व मनमोहन सिंग गेले होते. कारण आमची नावे सांगू नका नाहीतर आमच्यावरही ईडीची कारवाई होईल, अशी भीती या नेत्यांना आहे. शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्याच्या निषेधार्थ बारामती व पुणे बंद ठेवण्यात आले आहे. तेथे जावू नका, काळे झेंडे दाखवण्यात येतील, असे सांगण्यात आले. तरी मी तेथे गेलो. ही कामे आम्ही आधी केलीत, यापुढे काँग्रेस-राष्ट्रवादीला कायम करायची आहेत, अशी खिल्लीही त्यांनी उडवली.

सभेच्या अध्यक्षस्थानी कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.  संजय कुटे होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार धृपदराव सावळे, शेगाव नगराध्यक्षा शकुंतला बुच, जळगाव नगराध्यक्ष सीमाताई डोबे यांच्यासह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

युती होणारच!भाजपा सेनेची युती ही निश्चित होणार असून युतीला २२५ पेक्षा जास्त जागांवर यश मिळेल यात शंका नाही, अशी प्रतिक्रिया ना. रावसाहेब दानवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. युतीत किती जागा भाजपा व किती सेनेच्या असे विचारले असता त्यावर चर्चा सुरू आहे, असे ते म्हणाले. सर्व बाबी लवकरच आपल्यासमोर येतील परंतु एवढे निश्चित आहे की महाराष्ट्रात पुन्हा युतीचीच सत्ता येणार, असेही ते ठामपणे म्हणाले.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRaosaheb Danweरावसाहेब दानवेEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय