शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
3
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
4
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
5
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
6
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
8
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
9
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
10
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
11
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
12
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
13
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
14
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
15
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
16
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
17
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
18
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
19
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
20
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार

कृषी समृद्धी प्रकल्पात गैरव्यवहार, लेखापरीक्षण अहवालात ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 1:10 AM

विदर्भातील शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत करण्यासाठी शासनाने हाती घेतलेल्या ‘कृषी समृद्धी : समन्वयीत कृषी विकास’ प्रकल्पातील सुमारे ८०० कोटी रुपयांच्या निधीत गैरव्यवहार झाल्याचा ठपका लेखापरीक्षण अहवालात ठेवण्यात आला आहे.

- गणेश देशमुखमुंबई : विदर्भातील शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत करण्यासाठी शासनाने हाती घेतलेल्या ‘कृषी समृद्धी : समन्वयीत कृषी विकास’ प्रकल्पातील सुमारे ८०० कोटी रुपयांच्या निधीत गैरव्यवहार झाल्याचा ठपका लेखापरीक्षण अहवालात ठेवण्यात आला आहे. या प्रकल्पाचे तत्कालीन प्रमुख गणेश चौधरी यांच्या कार्यकाळात ही लूट झाल्याचे समोर आले आहे.सध्या कोकण भवनात विभागीय उपायुक्त पदावर कार्यरत असलेले चौधरी यांना मंत्रालयात अतिरिक्त मुख्य सचिव पदावर असलेल्या एका अधिकाºयाचा वरदहस्त असल्याने त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. सदर लेखापरीक्षण अहवाल शासनास सादर होऊन आता वर्षभराचा कालावधी लोटला आहे.विदर्भातील यवतमाळ, अमरावती, वर्धा, वाशिम, बुलडाणा आणि अकोला या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातीेल शेतकºयांना मानसिक आधार, कृषी सहाय्य आणि इतर प्रकारची मदत करण्यासाठी राज्य शासनाने डिसेंबर २००९ साली हा प्रकल्प हाती घेतला होता. वस्तुत: २०१७ पर्यंत उद्दीष्टपूर्ती होऊन हा प्रकल्प संपायला हवा होता; तथापि प्रशासकीय अनियमिततेमुळे दोनवेळा कालमर्यादा वाढविण्यात आली. प्रकल्प अद्यापही सुरूच आहे. अमरावतीचे विभागीय आयुक्त पीयूष सिंग हे या प्रकल्पाचे सध्या प्रभारी संचालक आहेत.या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी शासनाने आजतागायत पूर्णवेळ संचालकच नियुक्त केले नाहीत. रवींद्र ठाकरे, गणेश चौधरी, के.एम.अहमद या प्रभारी अधिकाºयांनी आतापर्यंत प्रकल्पाचे प्रमुखपद सांभाळले. चौधरी यांनी १ एप्रिल २०१६ रोजी अमरावती मुख्यालयी प्रकल्प संचालकपदाचा प्रभार स्वीकारला. चौधरी यांच्या दीड वर्षाच्या कारकिर्दीत झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आल्यानंतर सरकारने नागपूर येथील ए.एस.कुळकर्णी आणि असोसिएट्स यांच्याकडून प्रकल्पाचे लेखापरीक्षण करून घेतले. सदर लेखापरीक्षण अहवालात गैरव्यवहारासंदर्भात अनेक आक्षेप नोंदविले आहेत.शेतकरी, महिला, शेतमजूर यांना उत्पन्न निर्मितीसाठी विविध कार्यान्वयीन संस्थांमार्फत प्रशिक्षण देणे हा प्रकल्पातील एक भाग होता. चौधरी यांच्या कार्यकाळात वैष्णवी सामाजिक संस्था (कळंब), विनोबा भावे ग्राम विकास प्रशिक्षण (मालथन), उन्नती सोशल फाऊंडेशन, गोविंद ग्रामीण विकास संस्था (बुलडाणा), आदित्य नागराज चॅरिटेबल ट्रस्ट (परभणी) या संस्थांना कामे देण्यात आली. मात्र गुणवत्तेचे आवश्यक मापदंड या संस्थांनी पूर्ण केले नाहीत. चौधरी यांनी यापूर्वी पुण्याच्या वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेत काम केले आहे. त्यावेळच्या परिचयाच्या आधारे या संस्थांची गुणवत्ता मान्य करून प्रकल्पात सहभागी करवून घेतल्याचे निरीक्षण अंकेक्षण अहवालात नोंदविले आहे. या संस्थांनी कुठले काम केले, किती शेतकºयांना कौशल्य प्रशिक्षण मिळाले, किती शेतकºयाच्या उत्पन्नात वाढ झाली, किती शेतकरी नैराश्यातून बाहेर आले, याचा तपास ह्यलोकमतह्णने केला असता, सर्वत्र निराशाजनकच चित्र दिसले.सुरुवातीला प्रकल्प गतिमान होता. शेतकºयांनाही हुरूप होता. पण गणेश चौधरी आल्यानंतर गैरव्यवहार सुरू झाला. खोट्या संस्थांनी फक्त कागदोपत्री काम केले.- शिवानंद पाटील, लाभार्थी शेतकरी, म्हैसपूर, भातकुलीलेखापरीक्षण अहवाल अद्याप माझ्या वाचनात आला नाही. तो वाचून त्यातील निरीक्षणांनुसार निश्चितच कारवाई केली जाईल.- सुभाष देशमुख,सहकार व पणन मंत्री

टॅग्स :Farmerशेतकरी