पुणो : काँग्रेसने भ्रष्टाचार केल्याच्या दिशाभूल करणा:या जाहिराती भाजपा करीतआहे. भाजपाच्या रक्तातच भ्रष्टाचार भिनला आहे,अशी जळजळीत टीका काँग्रेसचे प्रचार प्रमुख नारायण राणो यांनी शनिवारी पुण्यात केली. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भ्रष्टाचारमुक्त काँग्रेसचा नारा देणा:या मोदींनी आधी भाजपा भ्रष्टाचारमुक्त करावे आणि मग आरोप करावा, असा टोलाही राणोंनी लगावला.
राणो म्हणाले, भाजपाने जाहिरातींमधून महाराष्ट्रात 11 लाख हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे सांगतात़ प्रत्यक्षात महाराष्ट्राचे अंदाजपत्रक पाहिले तर गेल्या पन्नास वर्षाचा महसूली खर्चही तेवढा होत नाही.’’ भ्रष्टाचाराची भाषा कोणी बोलावी असे सांगत, मी मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळात 5क् टक्के मंत्री भाजपाचे होते. ते किती धुतल्या तांदळासारखे होते हे मला माहीत आहे.
त्यांच्या कुंडल्या माङयाकडे आहेत. मोदी साहेब परवानगी द्या, मी एकएकाची नावे सांगतो, असे सांगत त्यांनी भाजपाचा समाचार घेतला. भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमध्येच सर्वाधिक भ्रष्टाचार असल्याची टीकाही राणो यांनी केली. (प्रतिनिधी)