पुणो : महाराष्ट्रातील सहकार, सिंचन आणि शहर विकासाचा आदर्श देशातील इतर राज्ये घेत होती़ त्याच महाराष्ट्रात स्वत:चे घर भरणारे लोक सत्तेवर आल़े भ्रष्टाचार हाच शरद पवार यांचा शिष्टाचार बनला आहे, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी केली़
गणोश कला क्रीडा मंच येथे भाजपा कार्यकत्र्याच्या मेळाव्यात ते बोलत होत़े शहा यांनी पश्चिम महाराष्ट्रातील भाजपाच्या प्रचाराचा प्रारंभ केला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि माथाडी कामगार नेते विजय कांबळे, माजी आमदार अभिरामसिंह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत वाणी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला़ या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे आदी उपस्थित होत़े
शहा यांनी मोदी सरकारने गेल्या 1क्क् दिवसांत केलेल्या कामाचे गुणगान करतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली़ शहा म्हणाले, वसंतराव नाईक यांच्या काळात सिंचनाचा सर्वाधिक वेग महाराष्ट्राचा होता़
शहर विकासाच्या महाराष्ट्राच्या मॉडेलकडे सर्व देश पहात होता़ पण गेल्या 15 वर्षात साखर कारखाने बंद पडत चालले आह़े घोटाळ्याला काही सीमा राहिली नाही़ राज्यात सर्वाधिक 35 हजार शेतक:यांनी आत्महत्या केली़ भ्रष्टाचाराला पवार यांनी व्यवहार बनविल्याने महाराष्ट्राचा स्तर खाली गेला असल्याचा आरोप त्यांनी केला़
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना अवश्य बोलावतात़ जनता नाराज असल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांना बोलू दिले
नाही़ एकप्रकारे जनता बोलत आहे, की खुर्ची खाली करा, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
‘महायुती’चा
उल्लेख टाळला
च्शहा यांनी भाषणात शिवसेना अथवा महायुतीचा कुठेही उल्लेख केला नाही. उलट भाजपाची महाराष्ट्रात सत्ता आणण्याचे आवाहन केले. त्यामुळे कार्यकत्र्यात युतीविषयीचा संभ्रम वाढला आहे.
मनसेत गळचेपीचा प्रयत्न : राम कदम
च्घाटकोपर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची 24 तास कामे करणारा आमदार असतानाही दीड वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील काहींनी माझी गळचेपी करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी माङयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव होता. त्यामुळे भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असे आमदार राम कदम यांनी स्पष्ट केले. अमित शहा यांच्या उपस्थितीत राम कदम यांनी भाजपात प्रवेश केला.