शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

कॉसमॉस बँकेच्या सायबर हल्ल्यातील ५ कोटी ७२ लाख रुपये हॉगकाँगमधून परत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 8:41 PM

काँसमॉस बँकेची ९४ कोटी ४२ लाख रुपयांची फसवणुक; याप्रकरणी आजपर्यंत १८ जणांना अटक

ठळक मुद्देदीड वर्षानंतर रक्कम मिळविण्यात यश परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामार्फत हाँगकाँग पोलीस, दुतावास यांच्याकडे सायबर पोलिसांचा पाठपुरावा

पुणे : कॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्यातील हाँगकाँग येथील हँगसेन बँकेद्वारे गोठविलेल्या रक्कमेपैकी ५ कोटी ७२ लाख ९५ हजार ८७ रुपये पहिल्या टप्प्यामध्ये कॉसमॉस बँकेस परत केली आहे. तब्बल दीड वर्षाच्या पाठपुराव्यानंतर ही रक्कम मिळविण्यात यश आले आहे. काँसमॉस बँकेच्या गणेशखिंड रोडवरील मुख्य कार्यालयाच्या ए़ टी़ एम़ स्वीचवर (सर्व्हर) सायबर चोरट्यांनी ११ ऑगस्ट २०१८ रोजी दरोडा घालून बँकेच्या व्हिसा व रुपे डेबिट कार्ड धारकांची माहिती चोरली. त्याद्वारे व्हिसा डेबिट कार्डद्वारे ७८ लाखांचे व्यवहार भारताबाहेर झाले असून रुपे डेबिट कार्डद्वारे २ कोटी ५० लाख रुपयांचे व्यवहार भारतात झाले आहे. एकूण १४ हजार ८४९ व्यवहाराद्वारे ८० कोटी ५० लाख रुपयांची फसवणुक करण्यात आली होती. त्यानंतर १३ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी साडेअकरा वाजता स्वीफ्ट ट्रान्झेंक्शन इनिशिएट करुन हाँगकॉग येथील हँगसेंग बँक या बँकेच्या एएलएम ट्रेडिंगच्या बँक खात्यावर १३ कोटी ९२ लाख रुपये जमा करुन ते काढून घेतले अशाप्रकारे काँसमॉस बँकेची ९४ कोटी ४२ लाख रुपयांची फसवणुक झाली होती. याप्रकरणी आजपर्यंत १८ जणांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास सायबर पोलिसांकडे देण्यात आला होता.सायबर पोलिसांनी तात्काळ हँगसेंग बँक व हाँगकॉंग पोलिसांशी संपर्क करुन काँसमॉस बँकेतर्फ तक्रार नोंदविली होती. त्याचा तपास डेटेक्टिव्ह हाँगकॉग पोलिसांचे लुंग यांच्याकडे देण्यात आला होता. तसेच हँगसेंग बँकेच्या म्हणण्यानुसार हाँगकाँग पोलीस व हँनसेंग बँकेमध्ये समन्वय साधून दिला होता. त्यानंतर दिल्ली येथे जाऊन १६ नोव्हेंबर २०१८ रोजी भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामार्फत हाँगकाँग पोलीस, हाँगकाँग दुतावास यांच्याकडे सायबर पोलिसांचा पाठपुरावा सुरु होता. या काळात हाँगकाँग पोलीसांचे तपास अधिकारी बदलण्यात आले. नवीन तपासी अधिकारी पँग यान लोक यांच्याशी सायबर पोलिसांनी संपर्क करुन त्यांना गुन्ह्याबाबत पूर्ण माहिती दिली. त्यानंतर पँग यान लोक यांनी कळविले की, पुणे सायबर पोलिसांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे काही रक्कम गोठविण्यात आलेली आहे. सायबर पोलिसांनी काँसमॉस बँकेला तात्काळ हाँगकॉगमध्ये सिव्हील सुट दाखल करण्याच्या सूचना दिल्या. हाँगकॉग न्यायालयामध्ये  काँसमॉस बँकेच्या लिगल टीमद्वारे सिव्हील सुट दाखल करण्यात आला व त्याचा पाठपुरावा करण्यात आला. हाँगकॉंग न्यायालयाने हेंनसेंग बँकेद्वारे गाठविण्यात आलेल्या रक्कमेपैकी ८ लाख २ हजार २८३. ६५ अमेरिकन डॉलर म्हणजेच ५ कोटी ७२ लाख ९५ हजार ८७ रुपये एवढी रक्कम पहिल्या टप्प्यामध्ये कॉसमॉस बँकेस परत केली आहे. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, तत्कालीन पोलीस उपायुक्त ज्योती प्रियासिंग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सहायक निरीक्षक सागर पानमंद, पोलीस नाईक अजित कुऱ्हे, संतोष जाधव या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :Puneपुणेcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसbankबँक