शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
2
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
3
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
4
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
5
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
6
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
7
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
8
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
9
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
10
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
11
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
12
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
13
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
14
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
15
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
16
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
17
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
18
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
19
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
20
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 

रेल्वे सब स्टेशनसाठी सहा कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2016 1:37 AM

मुकाई चौक, रावेत ते भक्ती-शक्ती चौक, निगडी रस्त्यावर पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.

पिंपरी : मुकाई चौक, रावेत ते भक्ती-शक्ती चौक, निगडी रस्त्यावर पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. मात्र, त्या दरम्यान असणाऱ्या रेल्वे सबस्टेशनचे स्थलांतरण करणे आवश्यक असून, त्यासाठी सुमारे पावणेसहा कोटी खर्च होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे मुकाई चौक, रावेत ते भक्ती-शक्ती चौक, निगडी या दरम्यान ४५ मीटर रुंद बीआरटीएस रस्ता विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. निसर्ग दर्शन सोसायटी, रावेत येथे या रस्त्याचे पुणे-मुंबई लोहमागार्मुळे दोन भागात विभाजन होत आहे. याठिकाणी उड्डाणपूल बांधणे आवश्यक असून, त्यासाठी ८७ कोटी, ४६ लाख, ५० हजार, २६६ रुपये रकमेचे काम बी. जी. शिर्के कंपनीला देण्यात आले आहे. या रस्त्यावरील प्रस्तावित उड्डाणपुलाचे संकल्पचित्र मध्य रेल्वेकडे मान्यतेसाठी देण्यात आले आहे. मात्र, या उड्डाणपुलाच्या संकल्पचित्रानुसार रेल्वेलाइनजवळ असलेले सबस्टेशन स्थलांतरीत करणे गरजेचे आहे. मध्य रेल्वेतर्फे या जागेची पाहणी करून सबस्टेशन स्थलांतरित करण्याचे अंदाजपत्रक तयार केले आहे आणि २४ जुलै २०१५ रोजी महापालिकेला सादर केलेल्या पत्रान्वये स्थलांतर शुल्क मध्य रेल्वेकडे जमा करण्याची मागणी केली आहे. ५ कोटी ७७ लाख ६३ हजार ४३ रुपये इतके स्थलांतरण शुल्क असून, ते जमा केल्यावरच पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पत्रान्वये मध्य रेल्वेने कळविले आहे. महापालिकेच्या सन २०१६-१७च्या अंदाजपत्रकामध्ये निसर्ग दर्शन सोसायटीजवळील रेल्वेलाईनवर उड्डाणपूल बांधण्याच्या कामासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)>रेल्वे उड्डाणपूल संकल्पचित्र आणि आराखड्यानुसार रेल्वेलाईनजवळ असलेले सब स्टेशन स्थलांतरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी रेल्वे बोर्डाला देण्यात येणाऱ्या ५ कोटी, ७७ लाख, ६३ हजार, ४३ रुपये इतक्या खर्चाच्या रकमेची तरतूद २० कोटींमधून केली आहे. त्याचप्रमाणे या उड्डाणपुलासंदर्भात अचानक उद्भवणाऱ्या घटनांमुळे बदल करावयाचा झाल्यास, त्यासाठी येणारा वाढीव खर्च रेल्वे बोर्डाला द्यायचा असल्यास आणि शासनाच्या कर प्रणालीमध्ये बदल झाल्यावर येणारा वाढीव खर्च होणार आहे.