बाजारभाव तिप्पट : कोथिंबीर विमानमार्गे रवाना
नामदेव मोरे - नवी मुंबई
जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमध्ये आता मिरची, कोथिंबिरीचीही भर पडली आहे. या वस्तूंचा देशभर तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातून कोलकाताला थेट हवाईमार्गे कोथिंबीर पाठविली जात असून, राजधानी दिल्लीतूनही मागणी वाढली आहे.
पावसाचे आगमन उशिरा झाल्यामुळे देशभर भाजीपाल्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. भाजीपाला सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. भाजीसोबत फोडणीसाठी आवश्यक असणा:या मिरची, कोथिंबिरीचाही मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यात पुणो, नाशिक, लातूरमध्ये कोथिंबिरीचे मोठे उत्पादन होते. परंतु पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातून रोज 1क् हजार किलो कोथिंबीर राजधानी दिल्लीला पाठविली जात आहे. कोलकातावरूनही मागणी वाढली आहे. सद्य:स्थितीमध्ये रोज सरासरी 2 हजार किलो माल विमानाने कोलकाताला पाठविला जात आहे.
हिरव्या मिरचीची किंमतही वाढू लागली आहे. मे महिन्यात होलसेल मार्केटमध्ये 12 ते 16 रुपये किलो असणारी मिरची आज 36 ते 4क् रुपयांवर गेली आहे. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर 8क् रुपयांपेक्षा जास्त आहेत. राज्यात नागपूर, अमरावती, नाशिक, धुळे, बुलढाणा, पालघर परिसरात मिरचीचे उत्पादन होते. परंतु सध्या तेथून आवक होत नाही. दरम्यान, नवीन पीक बाजारात येईर्पयत भाव वाढतच राहणार असल्याचे मत व्यापा:यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई - 5क् ते 6क् रुपये जुडी
दिल्ली - 1क्क् रु. किलो
कोलकाता - 15क् रु. किलो
अहमदाबाद - 6क् रु. किलो
मिरचीच्या महागाईचा ठसका
मिरचीचे व्यापारी रमेश वाडकर म्हणाले की, राज्यातून मिरचीची आवक थांबली आहे. आता फक्त कर्नाटकमधून संपूर्ण देशात मिरची पाठविली जाते. उत्पादनच नसल्यामुळे दर वाढले. नवीन पीक येईर्पयत मिरचीच्या महागाईचा ठसका उडणार आहे.
कोथिंबीर अजून महागणार
मुंबईतील कोथिंबिरीचे व्यापारी महेश गुप्ता यांनी सांगितले की, आवक कमी होत आहे. पुढील काही दिवस कोथिंबिरीचे दर अजून वाढण्याची शक्यता आहे.