अकोला : पावसाच्या अनिश्चिततेमुळे सलग दहा वर्षापासून सरासरी उत्पादन घटल्याने शेतकर्यांच्या हातात पैसाच शिल्लक नाही. अशा स्थितीत शासनाने घोषणेप्रमाणे कापसाला अग्रीम बोनस दिला नसून, दुसरीकडे बाजारात सोयबीन,तुर, मुग व हरबर्याचे दरही कोसळल्याने शेतकरी हतबल झाला आहे. विदर्भातील कृषी विकासाचा दर गत बारा वर्षांपासून शून्य टक्कयावरच आहे. भरीस भर नैसर्गिक आपत्ती, भूमी अधिग्रहण आणि शेतमालाच्या घसरलेल्या दरामुळे या विकास दरात घसरणच सुरू असल्याने विदर्भातील शेतकरी खचला आहे. मागील दहा वर्षाचा कृषी विकासाचा दर कमी-अधिक स्वरू पात असल्याचा निष्कर्ष आहे. त्याचे गंभीर परिणाम विदर्भातील शेतकर्यांना सोसावे लागत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. गत पाच वर्षांत शेतकर्यांच्या परिस्थितीत तसूभरही सुधारणा झाली नसून, नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढले आहे. विदर्भातील पावसाचे प्रमाण असमान असल्याने गेल्या दहा वर्षांत उत्पन्न घटले आहे. शेतकर्यांना नफ्याऐवजी तोटाच झाल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. अतवृष्टी, दुष्काळ यामुळे सरासरी उत्पादन घसरले आहे. यावर्षी सोयाबीन आणि कापसाचे हेक्टरी उत्पादनही घटले आहे. त्यामुळे यावर्षी तरी कापसाला अग्रीम बोनस मिळेल अशी शेतकर्यांना अपेक्षा होती; पण अद्याप शासनाने याबाबतीत कोणताच निर्णय घेतला नसून, बाजारात सोयाबीन, तुरीचे दर पडल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. परिणामी शेतकर्यांच्या हातात पैसाच शिल्लक नसून, कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुला-मुलींचे लग्न या सर्वामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढत असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. यावर्षी ही परिस्थितीची आणखी भीषण झाली आहे. यावर्षी शेतकर्यांना मशागतीला पैसा लागणार आहे; पण शेतकर्यांकडे पैसाच नाही. त्यामुळे शेतकरी सावकार, बँकांच्या पायर्या झिजवताना दिसत आहेत.थकीत कर्जाच्या वसुलीचा तगादा शासनाने यावर्षी कोणतेही कर्ज वसूल करू नये आणि कर्जाचे पाच वर्षासाठी पुर्नगठण केल्याने शेतकर्यांना दिलासा दिला आहे; पण काही बँकांनी थकीत कर्जासाठी वसुलीसाठी तगादा लावला आहे. यात जिल्हा बँकांचाही समावेश आहे.हरब-याचे दर झाले कमीविक्री हंगाम सुरू होताच हरबर्याचे दर ४,६00 रू पये प्रतिक्विंटल होते ते दर आजमितीतीस ४१00 ते ४२00 रू पयावर आले. सोयाबीन व तुरीच्या दरात चढउतार आहे.
कापसाला बोनस नाही, हरब-याचे दर घसरले
By admin | Published: January 30, 2016 2:14 AM