शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

मतमोजणीतील गोंधळाचा निषेध, ईव्हीएमची काढली प्रेतयात्रा

By admin | Published: February 28, 2017 3:07 PM

महानगरपालिका निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनद्वारे मतमोजणीत गोंधळ झाल्याचा आरोप करीत, या मुद्द्यावर भाजपा वगळता सर्वपक्षीय पराभूत उमेदवार रस्त्यावर उतरले.

 ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 28 - महानगरपालिका निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनद्वारे (ईव्हीएम) मतमोजणीत गोंधळ झाल्याचा आरोप करीत, या मुद्द्यावर भाजपा वगळता सर्वपक्षीय पराभूत उमेदवार रस्त्यावर उतरले. ‘ईव्हीएम’व्दारे  मतमोजणीतील गोंधळाचा निषेध करीत, ‘इव्हीएम ’विरोधी संघर्ष कृती समितीच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘ईव्हीएम’ची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली.
 
अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी २३ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. ‘ईव्हीएम’द्वारे मतमोजणी प्रक्रियेत ‘ईव्हीएम’ मशीनमध्ये सेटिंग करून निवडणुकीचे निकाल बदलविण्यात आले, असा आरोप करीत, निवडणुकीत पराभूत विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी ‘ईव्हीएम’द्वारे मतमोजणीतील गोंधळाच्या मुद्द्यावर ‘एल्गार पुकारला आहे. 
 
यासंदर्भात भाजपा वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप व शिवसेना इत्यादी राजकीय पक्षांसह अपक्ष पराभूत उमेदवारांच्या ‘ईव्हीएम ‘ विरोधी संघर्ष कृती समितीच्या समितीच्यावतीने २८ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘ईव्हीएम’ची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. 
 
विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पराभूत उमेदवार आणि अपक्ष पराभूत उमेदवारांच्यावतीने शहरातील अशोक वाटीका येथून काढण्यात आलेली ‘ईव्हीएम ’ची प्रतिकात्मक प्रेतयात्रा मध्यवर्ती बसस्थानक समोरुन गांधी मार्ग, पंचायत समितीसमोरुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचली. 
 
‘ईव्हीएम’व्दारे मतमोजणीचा निषेध करीत ‘ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव,निवडणूक रद्द करुन मतपत्रिकांव्दारे मतदान घ्या, मतदानाचा अधिकार जतन करा-हुकूमशाही बंद करा’ अशा घोषणा देत काढण्यात आलेली प्रतिकात्मक प्रेतयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर ‘ईव्हीएम’ विरोधी संघर्ष कृती समितीच्या एका शिष्टमंडळामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांना सादर करण्यात आले. 
 
या प्रतिकात्मक प्रेतयात्रेत काँग्रेसचे शहर अध्यक्ष बबनराव चौधरी, भारिप-बमसंचे गजानन गवई, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजय तापडिया, शिवसेनेचे तरुण बगेरे, स्वाती देशमुख, महेश गणगणे,  रफीक सिद्दिकी, कपिल रावदेव,  पंकज साबळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दादराव मते पाटील, राजेंद्र इंगोले, रामा तायडे, प्रतिभा अवचार, प्रशांत भारसाकळ, वंदना वासनिक, मनिष मोहोड,अरुंधती शिरसाट, मंगला घाटोळे, जीवन डिगे, विकास सदांशिव, मुकीम अहमद, सोमनाथ अडगावकर, बाळासाहेब इंगळे यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पराभूत उमेदवार आणि अपक्ष पराभूत उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रतिकात्मक ‘ईव्हीएम’ पोलिसांनी केली जप्त!
‘ईव्हीएम’विरोधी संघर्ष कृती समितीच्यावतीने मोर्चा काढून  प्रतिकात्मक  ‘ईव्हीएम’ची प्रेतयात्रा काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीसांनी प्रतिकात्मक ‘ईव्हीएम’ ताब्यात घेवून जप्त केली.