नाशिक : मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बुधवारी तिसऱ्या दिवशीही माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या फार्मवरील मालमत्तेच्या मूल्यांकनाची कारवाई सुरू होती़बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या भुजबळ यांच्या मालमत्तेच्या मूल्यांकनाचे काम सोमवारपासूनसुरू आहे़ बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, त्यांचा पुतण्या माजी खा. समीर भुजबळ, मुलगा आ. पंकज भुजबळ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे़ त्यानुसार सिडकोतील भुजबळ फार्ममधील बंगले तसेच मालमत्तेचे सोमवारपासून मूल्यांकन सुरू आहे़ भुजबळ फार्ममध्ये काही परदेशी व पुरातन वस्तूही असल्याने त्यांची किंमत ठरविताना अधिकाऱ्यांना अडचणी येत असल्याचे वृत्त आहे़ (प्रतिनिधी)
भुजबळांच्या मालमत्तेची तिसऱ्या दिवशीही मोजदाद
By admin | Published: August 25, 2016 5:13 AM