लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : देशात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने तांदळाच्या चांगल्या उत्पादनाची आशा आहेत. यंदा देशात तब्बल ९ कोटी ४५ लाख टन तांदळाचे उत्पादन होईल, असा प्राथमिक अंदाज केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने जाहीर केला आहे. २0१६ मध्ये देशात तांदळाचे ९ कोटी ६४ लाख टन उत्पादन झाले होते. यंदाही सरासरी तितकेच उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केल्याची माहिती तांदळाचे व्यापारी व फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेश शहा यांनी दिली.केंद्र शासनाने यंदा देशभरातून सुमारे ३७५ लाख टन भात खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत ७0 लाख टनांची खरेदी केली आहे. भात खरेदीसाठी सरकारकडून प्रतिक्विंटलसाठी १५५0 रुपये हमीभाव देण्यात येणार आहे. तर उच्च दर्जाच्या भातासाठी हा दर १५९0 रुपये प्रतिक्विंटल केला आहे.बाजारपेठेत नवीन तांदळाची आवक सुरू झाली आहे. सध्या बासमती तांदळाच्या ११२१, १४0१, १५0९ या जातींची आवक सुरू झाली आहे. आतापर्यंत बाजारात सुमारे १२५ लाख टन भाताची आवक झालेली आहे. बासमती तांदळाच्या या जाती नोव्हेंबरअखेर पर्यंत देशातील सर्व बाजारपेठामध्ये उपलब्ध होतील, असे शहा यांनी स्पष्ट केले.-
देशात यंदा तांदळाचे साडेनऊ कोटी टन उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 1:40 AM
२0१६ मध्ये देशात तांदळाचे ९ कोटी ६४ लाख टन उत्पादन झाले होते. यंदाही सरासरी तितकेच उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केल्याची माहिती तांदळाचे व्यापारी व फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेश शहा यांनी दिली.
ठळक मुद्देकेंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने जाहीर केला प्राथमिक अंदाज