शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

देशातील सर्वात मोठी कर्जमाफी हा दावा निखालस खोटा- सचिन सावंत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 10:59 PM

89 लक्ष शेतकऱ्यांना 34000 कोटी रुपयांची देशातील सर्वात मोठी कर्जमाफी हा मुख्यमंत्र्यांचा दावा पूर्णपणे फोल ठरला असून, या कर्जमाफीतून लाखो शेतकरी वंचित राहिल्याचे आतापर्यंतच्या कर्जमाफी अंमलबजावणी प्रक्रियेतून स्पष्ट झाले असल्याची प्रखर टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

मुंबई- 89 लक्ष शेतकऱ्यांना 34000 कोटी रुपयांची देशातील सर्वात मोठी कर्जमाफी हा मुख्यमंत्र्यांचा दावा पूर्णपणे फोल ठरला असून, या कर्जमाफीतून लाखो शेतकरी वंचित राहिल्याचे आतापर्यंतच्या कर्जमाफी अंमलबजावणी प्रक्रियेतून स्पष्ट झाले असल्याची प्रखर टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.पत्रकारांना संबोधित करताना सावंत म्हणाले की,राज्यातील कर्जमाफीत मंजूर झालेल्या ग्रीन यादीत 47 लक्ष 46 हजार 222 शेतकऱ्यांचा समावेश असला तरी आतापर्यंत केवळ 31 लक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर12262 कोटी रुपये जमा झाले आहेत. मंजूर यादीतील उर्वरीत 16 लक्ष 46 हजार 168 शेतकरी अजूनही प्रतिक्षेत आहेत. ग्रीन यादीत असूनही या शेतकऱ्यांचे भवितव्य पुनर्चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे.  एकूण शासनाने दावा केलेल्या 89 लक्ष शेतकऱ्यांपैकी अर्ज भरण्याच्या अडचणींतून केवळ 77 लक्ष शेतकरी अर्ज भरू शकले, त्यामुळे पहिल्या फटक्यात 12 लक्ष शेतकरी कमी झाले. त्यातही तपासणी करुन 69 लक्ष शेतकऱ्यांचे अर्ज विचारात घेतले गेले म्हणजे 8 लक्ष अजून कमी करण्यात आले. अशा तऱ्हेने 20 लक्ष शेतकरी कमी केले गेले. यानंतर शासनाने ग्रीन लिस्ट जारी करत 69 लक्ष शेतकऱ्यांपैकी केवळ 47 लक्ष शेतकऱ्यांना पात्र ठरवून अजून 22 लक्ष शेतकऱ्यांवर अपात्रतेची तलवार टांगली आहे आणि त्यांना कायम स्वरुपी पिवळ्या, लाल यादीत प्रलंबित ठेवण्याचा घाट शासनाने घातलेला आहे. यातूनच जवळपास कमाल 42 लक्ष शेतकरी वंचित ठेवण्यात आले आहेत असे प्रत्यक्षदर्शी दिसत आहे.यानंतर एकवेळ समझोता योजना ही जवळपास धूळफेक ठरली असल्याने जवळपास 8 लक्ष शेतकऱ्यांनी त्याचा लाभ अजूनही घेतला नाही आणि भविष्यातही घेण्याची शक्यता दिसत नाही. एकवेळ समझोता योजना ही फइक च्या नियमावली प्रमाणे नाही. बँकांनी स्वतः एक पैसाही कमी केलेला नाही. काँग्रेस पक्षाने या अगोदरच या प्रकरणाला वाचा फोडली होती. शासनाने आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. बँका पैसे कमी करत नाहीत, शेतकऱ्यांकडे पैसा नाही व शेतकऱ्यांनी उर्वरीत रक्कम भरल्याशिवाय शासनास पैसे देय नाहीत. म्हणूनच केवळ एकूण मंजूर  8 लक्ष 4 हजार 336खात्यांपैकी केवळ  7969 शेतकऱ्यांनी आजवर एकवेळ समझोता योजनेचा लाभ घेतला आहे. एकूण ग्रीन यादीतील मंजूर 5836.83 कोटी रकमेतून केवळ एकूण 64 कोटी रुपयेच शासनाने भरले आहेत. यामुळे एकवेळ समझोता योजनेतील पात्र 8 लाख शेतकरी व ग्रीन यादीतील उर्वरीत शेतकऱ्यांसहित 50 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या दबावामुळे एवढी तरी कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली अन्यथा यापेक्षाही अधिक शेतकरी वंचित राहिले असते.कर्जमाफीच्या प्रचंड दिरंगाईमुळे नवीन कर्जवाटप यावर्षी प्रचंड कमी झाले असून खरीपाचे कर्जवाटप उद्दिष्ट्यांच्या 45 % व  डिसेंबर 2017 पर्यंत रब्बीचे कर्जवाटप उद्दिष्ट्यांच्या 17 %  झाले आहे. सावकारांच्या दुष्टचक्रात सरकारच शेतकऱ्यांना ढकलत असल्याचा आरोप सावंत यांनी केला.कर्जमाफीची न संपणाऱ्या प्रक्रियेतून शासनाने जाणीवपूर्वक केलेल्या चालढकलीमुळे शेतकऱ्यांचे भवितव्य अधांतरी ठेवले गेले आहे, असेही सावंत म्हणाले. 

टॅग्स :Sachin sawantसचिन सावंत