सांगली : देशाची अर्थव्यवस्था सध्या चिंताजनक स्थितीत असून, आगामी काळात अनेक क्षेत्रांना त्याचा मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपकडून ही परिस्थिती सुधारण्याची कोणतीही शक्यता वाटत नाही, असे मत राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
पवार म्हणाले, निर्यात क्षेत्रासह देशांतर्गत उद्योग, व्यवसायांना बिघडलेल्या अर्थव्यवस्थेचा मोठा फटका बसला आहे. विकासदर कमी होत आहे. अर्थव्यवस्थेसंदर्भात प्रसिद्ध होणारे आकडे चांगले नाहीत.आर्थिक परिस्थितीबाबत देशातील अनेक अर्थतज्ज्ञांनी भीती व्यक्त केली असतानाही त्यावर उपाययोजना केल्या नाहीत. भारतीय रिझर्व्ह बॅँकेच्या पदावरून लोक राजीनामा देऊन दूर होत आहेत. यावरूनच देशाच्या अर्थव्यवस्थेचे गंभीर चित्र स्पष्ट होते. भाजप जोपर्यंत सत्तेत आहे, तोपर्यंत त्यांच्याकडून कोणत्याही सुधारणांची शक्यता नाही. भाजपमधील खासदारही पक्षाच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. दोन नेत्यांच्या हातीच पक्षाची सूत्रे असल्यामुळे नाराजी वाढत आहे. यापूर्वी पक्षात असे चित्र नव्हते, असेही पवार यांनी सांगितले.
एका पावसाने राज्यातील सत्ता उलथवलीसांगली : राजकारणात कोणत्याही स्थितीची काळजी करीत बसायचे नाही. दिवस जसे येतात तसे ते दिवस जातात आणि बदल व्हायचे तसे होतात. एका पावसाने राज्यातील सत्ता उलथवली, हेही लक्षात ठेवावे, अशी टिप्पणीही शरद पवार यांनी केली.
सदाशिवराव पाटील यांचा राष्टÑवादीत प्रवेशखानापूर-आटपाडीचे काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्यासह विट्याच्या नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्यासह २३ नगरसेवक, २५ हून अधिक सरपंच, उपसरपंच यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्टÑवादीत प्रवेश केला.जातीयवाद घातकनागरिकत्व कायद्याबद्दल पवार म्हणाले, कायद्यातील तरतुदी करताना एका ठरावीक समाजघटकाला बाजूला ठेवून काही नियम बनविले जात असतील, तर ते देशाच्या एकसंधतेसाठी चांगले नाही.