सोलापूर : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने प्रकाशित केलेल्या पाचवीच्या नव्या अभ्यासक्रमात ‘घामाचा तलाव’ ही कथा समाविष्ट केली आहे़ जेष्ठ साहित्यक आणि सानेगुरूजी कथामालेचे कुटुंब प्रमुख अवधूत म्हमाणे यांची ही कथा आहे.पाचवीच्या मराठी ‘सुगमभारती’ या पुस्तकात ‘घामाचा तलाव’ १६ वा पाठ आहे़ उर्दू, कन्नड, तेलुगु, गुजराती, सिंधी या माध्यमातील सुमारे १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना हा पाठ शिकवला जाणार आहे़ श्रमदानाची महती सांगणारी ही ग्रामीण कथा आहे़ अवधूत म्हमाणे यांची बच्चे कंपनीसाठी सुमारे ८० पुस्तके प्रकाशित झाली असून साने गुरुजी कथामालेचे ते सोलापुरातील प्रमुख आहेत़‘घामाचा तलाव’ या सोबतच चार साहित्यिकांच्या साहित्यकृती एकाच वेळी शालेय अभ्यासक्रमात असण्याचा मान सोलापूरने मिळवला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या मराठी भाषा समितीचे (कार्यगट) सदस्य पद्माकर कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला दिली़हे आहेत चार मानकरी साहित्यिकजेष्ठ कवी स्व़ दत्ता हलसगीकर (‘महिने’ ही कविता दुसरी आणि ‘उंची’ ही कविता आठवीच्या पुस्तकात), निर्मला मठपती (‘मुग्धा लिहू लागली’- तिसरीच्या पुस्तकात कथा), मुबारक शेख (‘पोलीस दादा’- ही कविता तिसरीच्या पुस्तकात) आणि अवधूत म्हमाणे यांची कथा यंदा पाचवीच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे.सरकारी योजनांवर अवलंबून न राहता गावच्या विकासासाठी सर्वांनी योगदान देणे गरजेचे आहे़ या पार्श्वभमीवर इयत्ता पाचवीच्या सुगमभारती पुस्तकात माझ्या ‘घामाचा तलाव’ या कथेचे समावेश झाल्याने श्रमदानाचा हा संदेश राज्यातील लाखो मुलांपर्यंत जाणार याचा मनस्वी आनंद झाला आहे़ - अवधूत म्हमाणे
अवधूत म्हमाणे यांचा ‘घामाचा तलाव’ अभ्यासक्रमात
By admin | Published: June 14, 2015 1:54 AM