शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

गणेश नाईकांना न्यायालयाचा दणका

By admin | Published: May 10, 2017 12:07 AM

सीबीडीमधील ग्लास हाऊस व एमआयडीसीतील बावखळेश्वर मंदिर परिसरातील बांधकामाविषयी माजी मंत्री गणेश नाईक यांचे भाचे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई: सीबीडीमधील ग्लास हाऊस व एमआयडीसीतील बावखळेश्वर मंदिर परिसरातील बांधकामाविषयी माजी मंत्री गणेश नाईक यांचे भाचे संतोष तांडेल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांची याचीका रद्द केली आहे. भाच्याची याचीका फेटाळल्याने नाईक यांना न्यायालयाचा मोठा दणका बसला आहे. दोन्ही ठिकाणची जमीन अनुक्रमे सिडको व एमआयडीसीच्या ताब्यात जाणार असून सिडकोच्या महत्वकांक्षी मरीना प्रकल्पाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. सीबीडीमधील खाडीकिनारी ५६०० चौरस मीटर भूखंडावर संतोष तांडेल यांनी बांधकाम केले होते. येथील ३०० चौरस मिटर क्षेत्रफळावर ग्लास हाऊसचे बांधकाम करण्यात आले होते. याशिवाय तांडेल यांनी एमआयडीसीतील १ लाख ४५ हजार चौरस मीटर भुखंडावर अतिक्रमण केले होते. यापैकी ५५ हजार चौरस मिटरवर नारळाची झाडे, १० हजार चौरस मिटरवर तलाव, १५ हजार चौरस मीटर भुखंडावर पक्के रस्ते, २० हजार चौरस मीटरवर पेव्हर ब्लॉक, ३०० चौरस मीटरवर कार्यालय व ४०० चौरस मीटरवर मंदिरांचे बांधकाम करण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी केलेल्या अतिक्रमणाविरोधात सामाजीक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी २०१३ मध्ये जनहीत याचिका दाखल केली होती. न्यायालयाने दोन्ही ठिकाणची अतिक्रमण हटवून भूखंड संबंधित संस्थांनी ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. दोन्ही बांधकामे तांडेल याच्या नावावर असली तरी त्याठिकाणी राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक व त्यांच्या कुटुंबियांचा सदैव वावर असायचा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात तांडेल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने ग्लास हाऊसच्या जागेवर सिडकोचा मरीना प्र्रकल्प उभारण्यात व बावखळेश्वर परिसरातील बांधकाम हटविण्यास स्थगिती दिली होती.