शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
2
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
4
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
6
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
7
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
8
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
9
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
10
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
11
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
12
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
13
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
14
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
15
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
17
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
18
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
19
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
20
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया

राबिया खानला न्यायालयाची नोटीस

By admin | Published: January 28, 2017 3:53 AM

पांचोली कुटुंबीयांची बदनामी केल्याबद्दल झरीना वहाब व आदित्य पांचोलीने दाखल केलेल्या अवमान याचिकेवर उत्तर देण्यासाठी उच्च न्यायालयाने

मुंबई : पांचोली कुटुंबीयांची बदनामी केल्याबद्दल झरीना वहाब व आदित्य पांचोलीने दाखल केलेल्या अवमान याचिकेवर उत्तर देण्यासाठी उच्च न्यायालयाने दिवंगत अभिनेत्री जिया खानची आई राबिया खानला शुक्रवारी नोटीस बजावली.राबिया खान सोशल साईट्सवर पांचोली कुटुंबीयांची विशेषत: सूरज पांचोलीची सतत बदनामी करत असल्याने तिच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, यासाठी गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात झरीना वहाब आणि अदित्य पांचोली यांनी राबियाविरुद्ध अवमान याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. गौतम पटेल यांच्यापुढे होती.याचिकेनुसार, राबियाने पांचोली कुटुंबीयांची बदनामी न करण्याचे आश्वासन यापूर्वीच न्यायालयाला दिले आहे. पांचोली कुटुंब व विशेषत: सूरज याच्याविरुद्ध कोणतीही टिप्पणी न करण्याचा तसेच जिया व सूरजच्या नात्यासंबंधी कोणताही प्रतिकूल माहिती उघड न करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने राबिया खान यांना दिला होता व तसे आश्वासनही तिने न्यायालयाला दिले होते. ‘तरीही राबिया तिच्या टष्ट्वीटर अकाऊंटवरून आणि प्रसारमाध्यामांना माहिती देऊन पांचोली कुटुंबीयांना बदनाम करत आहे,’ असा युक्तिवाद पांचोलीच्या वकिलांनी उच्च न्यायालयात केला. २०१४ मध्ये झरीना व आदित्यने राबियाविरुद्ध बदनामीचा दावा दाखल केला आहे. याचिकेत, राबिया तिच्या टष्ट्वीटर अकाऊंटवरून सूरज व पांचोली कुटुंबीयांना शिवीगाळ करते असे नमूद करण्यात आले आहे. न्या. पटेल यांनी राबियाला ३ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)