शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळालाही उद्याच शपथ द्यायची की नाही, संध्याकाळी हायकमांड ठरविणार; रुपानींचे संकेत...
2
Devendra Fadnavis: "चार गोष्टी मनासारख्या होतील, चार विरुद्ध होतील"; फडणवीसांचा इच्छुकांना मेसेज
3
ते पुन्हा आले! २०१९ चा 'घात' ते २०२४ ची 'लाट'; देवेंद्र फडणवीसांसाठी कसा होता ५ वर्षांचा प्रवास?
4
भारतानं UNGA मध्ये इस्रायलविरोधातील ठरावाच्‍या बाजूनं केलं मतदान! जाणून घ्या, 193 देशांची भूमिका काय?
5
महाराष्ट्र-हरयाणामध्ये भाजपने षड्यंत्र रचून विजय मिळवला? अरविंद केजरीवालांचा मोठा दावा
6
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरुच; खरेदीपूर्वी पाहा सोन्याचे लेटेस्ट दर
7
Vaibhav Suryavanshi च्या भात्यातून आली कडक फिफ्टी! लाँग सिक्सरसह दाखवली ताकद (VIDEO)
8
देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याची पत्रिका व्हायरल; बघा, त्यांच्यासोबत कोण-कोण घेणार शपथ?
9
रेल्वे प्रवाशांना प्रत्येक तिकिटावर किती सबसिडी मिळते? अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सांगितलं...
10
दत्त जयंती: इच्छा आहे, पण गुरुचरित्र पारायण शक्य नाही? ‘हे’ स्तोत्र म्हणा, पूर्ण पुण्य मिळवा
11
७५ वर्षांचे असूनही फिट अँड फाइन कसे? नाना पाटेकर म्हणतात- "जीममध्ये जाता येत नसेल तर..."
12
महागाईत ग्राहकांना बसणार आणखी एक चटका! Swiggy वरून ऑर्डर करणे महागणार, 'हे' शुल्क वाढणार
13
'शिवेंद्रराजेंना मंत्री करा' म्हणत टॉवरवर आंदोलन; होमगार्डने पोलीस प्रशासनाला वेठीस धरले
14
Devendra Fadnavis : नगरसेवक ते मुख्यमंत्री...अशी आहे देवेंद्र फडणवीस यांची झंझावाती राजकीय कारकीर्द!
15
साराचा नवा प्रवास! गोरगरिब लेकरांसाठी काम करत तेंडुलकर घराण्याची परंपरा जपण्याचा 'ध्यास'
16
डिफेन्स स्टॉक्सची मोठी झेप; ₹२१७७२ कोटींच्या अधिग्रहण प्रस्तांवाना मंजुरी; कोणते आहेत शेअर्स?
17
"आता मला लवकर लग्न करायचंय; ३ मुलांना जन्म द्यायचाय, जर दोन वर्षांत मुलगा..."
18
Margashirsha Guruvar 2024: पहिल्यांदाच महालक्ष्मी व्रत करणार्‍यांसाठी पूजेची सविस्तर माहिती!
19
मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार: ७ राशींवर धनलक्ष्मी कृपा, लॉटरीतून लाभ; अपार यश, भरभराटीचा काळ!

आईला न सांभाळणाऱ्या प्राध्यापकास कोर्टाची तंबी, उदरनिर्वाहासाठी दरमहा पैसे देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 7:34 AM

Court News: ‘तो’ पाच वर्षाचा असताना वडिलांचे छत्र हरपले. आईने मोलमजुरी करून त्याला शिकवले, तो प्राध्यापक झाला, लाखाच्यावर पगार घेऊ लागला. मात्र आईचा सांभाळ करण्यास नकार दिला.

पैठण(जि. औरंगाबाद) : ‘तो’ पाच वर्षाचा असताना वडिलांचे छत्र हरपले. आईने मोलमजुरी करून त्याला शिकवले, तो प्राध्यापक झाला, लाखाच्यावर पगार घेऊ लागला. मात्र आईचा सांभाळ करण्यास नकार दिला. शिवाय विश्वासघात करून तिच्या नावावरील जमीनही विकली. ९५ व्या वर्षी जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या वृध्द आईला मुलाने दरमहा सात हजार रुपये द्यावेत असे आदेश पैठण न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.एस. वाघ यांनी दिले.पैठण येथील प्रयागाबाई बाबुराव आनंदकर (९५, रा. रामनगर) यांनी प्राध्यापक असलेला मुलगा सांभाळत नसल्यामुळे उदरनिर्वाहासाठी पैठण न्यायालयात ॲड. विजकुमार मुळे, ॲड. सचिन पाटील, ॲड. ए.ए. राका यांच्यामार्फत अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी साक्षपुरावे व झालेल्या सुनावणीतून सव्वा लाख रूपये पगार असलेला मुलगा आईचा सांभाळ करत नसल्याचे ॲड. विजयकुमार मुळे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.पती नसताना तीन मुली व एक मुलाचा कष्टाने संभाळ करुन मुलींची लग्ने केली तर मुलाला प्राध्यापक बनवले. मुलासाठी जमीन पाहिजे म्हणून चार एकर जमीन जपून ठेवली. मुलगा मोठा झाल्यावर सुखाचे दिवस पाहायला मिळतील ही भाबडी आशा बाळगणाऱ्या प्रयागाबाईच्या मुलाने तिचा विश्वासघात करुन जमीन विकली. आणि तिला वाऱ्यावर सोडले. प्रयागबाईला तीन मुलींकडे आसरा घ्यावा लागत आहे अशी भूमिका वकिलांनी न्यायालयासमोर मांडली. मुलगा प्रा. अर्जुन आनंदकर याला पैठण न्यायालयाने खडे बोल सुनावून दरमहा सात हजार रूपये आईच्या उदरनिर्वाहासाठी देण्याचे आदेश काढले. संबंधित रक्कम आठ दिवसांच्या आत जमा करावी, असेही आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :Courtन्यायालय