मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दहा लाखांच्यावर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात तब्बल २४ हजार ८८६ कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १० लाख १५ हजार ६८१ इतकी झाली आहे.
राज्यात आज दिवसभरात ३९३ रुग्णांचा मृत्यू झाला. तर १४,८०४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच, राज्यात सध्या २ लाख ७१ हजार ५६६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील कोरोना मृत्यू दर हा २.८३ वर गेला आहे.
बरे होण्याचे प्रमाण ७०.४ टक्केआज १४ हजार ३०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आतापर्यंत ७ लाख १५ हजार ०२३ जणांनी कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.०४ टक्के एवढे झाले आहे.
मृत्यूदर २.८३ टक्केसध्या राज्यातील मृत्यूदर २.८३ टक्के एवढा झाला आहे. तर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५० लाख ७२ हजार ५२१ नमुन्यांपैकी १० लाख १५ हजार ६८१ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात १६ लाख ४७ हजार ७४२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर ३८ हजार ४८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
देशात गेल्या २४ तासांत ९६, ५५१ रुग्ण देशातही रुग्णांनी आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले. एकाच दिवसात तब्बल ९६ हजार ५५१ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर आज १२०९ रुग्णांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण रुग्णांची संख्या आता ४५ लाख ६२ हजार ४१४ झाली आहे.
आणखी बातम्या...
- Zomato देणार गुंतवणूकदारांना पैसे कमविण्याची संधी, पुढील वर्षात IPO ची शक्यता
- Apple सुद्धा आणणार फोल्डेबल स्मार्टफोन? सॅमसंगचा डिस्प्ले वापरणार - रिपोर्ट
- मराठा आरक्षण : राज्य सरकार सोमवारी सरन्यायाधीशांकडे अर्ज करणार - अशोक चव्हाण
- कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई सूड बुद्धीने, आशिष शेलारांचा पालिकेसह सरकारवर हल्लाबोल
- महाविकास आघाडीला मराठा समाज माफ करणार नाही, विनायक मेटेंची टीका
- "जलयुक्त शिवारमध्ये १० हजार कोटी रुपये बुडवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा"
- सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये निघाली भरती