शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

गायीचे दूध दोन रुपयांनी महागले ; येत्या ८ जूनपासून होणार दरवाढ लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2019 12:00 PM

गेल्या आठवड्यातच काही खासगी दूध व्यावसायिकांनी गायीच्या दुधाच्या किंमतीत २ रुपयांनी वाढ केली आहे.

ठळक मुद्देकात्रजच्या दूध दरवाढीचा निर्णय २५ जूनलादुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्यावे

पुणे : गायीच्या दूध दरामधे प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या सभेत मंगळवारी घेण्यात आला. ही दरवाढ येत्या ८ तारखेपासून लागू होणार आहे.दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कात्रज येथील पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या सभागृहात बैठक झाली. त्यात दूध दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. दूध उत्पादक संघाचे उपाध्यक्ष गोपाळराव म्हस्के, संघाच्या पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, ऊर्जा दूध संघाचे प्रकाश कुतवळ, सोनाई दूध संघाचे अध्यक्ष दशरथ माने, शिवामृतचे धैर्यशील मोहिते या वेळी उपस्थित होते. या दूध संघाचे राज्यभरात ११० सदस्य आहेत. गेल्या आठवड्यातच काही खासगी दूध व्यावसायिकांनी गायीच्या दुधाच्या किंमतीत २ रुपयांनी वाढ केली आहे. पाठोपाठ जिल्हा दूध उत्पादक संघ आणि उर्वरीतखासगी व्यावसायिकांनी देखील भाव वाढीचा निर्णय घेतला. म्हशीचे भाव मात्र पुर्वी प्रमाणेच कायम राहणार आहेत. सध्या बाजारात गायीचे दूध ४२ ते ४४ आणि म्हशीचे दूध ५२ चे ५६ रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध आहे. -------------कात्रजच्या दूध दरवाढीचा निर्णय २५ जूनलादूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत दुधाच्या भावात वाढ करण्याचा निर्णय घेतला असला तरी तूर्तास कात्रजच्या दूधाचे भाव पूर्वी प्रमाणेच असतील. येत्या २५ जून रोजी पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाची बैठक बोलावली जाईल. त्यात दरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात येईल. त्यात दरवाढीचा निर्णय होणार असल्याचे जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी सांगितले. -----------------------दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्यावेराज्यातील दुष्काळी स्थिती, पशूखाद्याचे वाढलेले दर, डिझेलमधील दरवाढीमुळे वाहतुक खर्चात झालेली वाढ याचा विचार करुन सरकारने पुढील तीन महिन्यांसाठी दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्यावे. त्यामुळे शेतकºयांना ३० रुपये लिटरप्रमाणे भाव देता येईल, असे दूध उत्पादक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष विनायक पाटील म्हणाले. सरकारने गेल्या वर्षी जाहीर केलेले दूध अनुदान डिसेंबर पर्यंत मिळाले. मात्र, त्यानंतरचे तब्बल १५ कोटी रुपये जिल्हा दूध उत्पादक संघाचे थकीत आहेत. लवकरात लवकर हे पैसे मिळावेत अशी अपेक्षा जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी व्यक्त केली.  

टॅग्स :Puneपुणेmilkदूध