शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

गोवंश हत्याबंदी; निर्णयाला आव्हान

By admin | Published: May 08, 2016 3:44 AM

उच्च न्यायालयाने गोवंश हत्याबंदी कायम केली असली तरी परराज्यातून आलेले मांस बाळगण्यास परवानही दिल्याने राज्य सरकार या निर्णयाबाबत समाधानी नाही, तर दुसरीकडे

मुंबई : उच्च न्यायालयाने गोवंश हत्याबंदी कायम केली असली तरी परराज्यातून आलेले मांस बाळगण्यास परवानही दिल्याने राज्य सरकार या निर्णयाबाबत समाधानी नाही, तर दुसरीकडे ही बंदी कायम केल्याने बॉम्बे बीफ डिलर असोसिएशन नाराज आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि बॉम्बे बीफ डिलर असोसिएशन सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार आहेत. राज्यातील गोवंशातील प्राण्यांना संरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय योग्य आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य प्राणी संरक्षण कायदा वैध ठरवला. परंतु, त्याचवेळी उच्च न्यायालयाने या कायद्यातील कलम ५ (डी) व ९ (बी) अवैध ठरवून सरकारवर टीकाही केली. ही दोन्ही कलमे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारी आहेत, असे न्या. अभय ओक व न्या. एस. सी. गुप्ते यांच्या खंडपीठाने म्हटले.उच्च न्यायालयाने दोन कलमे अवैध ठरवली असली तरी कायदा वैध आहे, असे म्हटले आहे. वकिलांशी सल्लामसलत करून सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देऊ,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. दुसरीकडे बॉम्बे बीफ डिलर असोसिएशननेही सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे. राज्यातून गोवंशातील प्राण्यांची कत्तल, विक्री, खरेदी करण्यावर घातलेली बंदी हटवावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असे असोसिएशनने म्हटले. (प्रतिनिधी)