शहरं
Join us  
Trending Stories
1
बँकांनी १६ लाख कोटी रुपयांवर सोडले पाणी; मोठमोठी कर्जे बुडीत खात्यात, पहिल्या क्रमांकावर कोणती बँक?
2
आता पहिलीपासूनच इंग्रजीबरोबर हिंदीही सक्तीची, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासूनच अंमलबजावणी
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२५: प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, एखादी आनंददायी बातमी मिळेल
4
वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना स्थगिती देण्याचा विचार, सर्वाेच्च न्यायालयाने केले स्पष्ट
5
युद्ध फायद्याचे? सेन्सेक्स ७७ हजारांवर, परदेशी गुंतवणूकदारांकडून देशात पैसे गुंतवणे सुरू
6
आरोपींच्या घरांवर बुलडोझर कारवाई; नागपूर महानगरपालिकेने मागितली बिनशर्त माफी
7
निकाल देईपर्यंत कुणाल कामराला अटक करू नका; शिंदेंवरील आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी हायकोर्टाचा आदेश
8
टॅरिफ युद्ध शिगेला: अमेरिकेने चीनवर लादले २४५ टक्के आयात शुल्क, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
9
१७ कोटी जीएसटी भरा; विद्यापीठाला नोटीस, महाविद्यालय संलग्नता शुल्कावर करआकारणी; भुर्दंड विद्यार्थ्यांना?
10
सुपरओव्हरमध्ये दिल्लीचा राजस्थानवर रोमहर्षक विजय!
11
केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल! कर्मचारी खर्चात कपात; सुधारणांवर फोकस
12
Mumbai Metro 2B: मानखुर्द-चेंबूर मार्गावर मेट्रो रेल्वेची चाचणी, मेट्रो कुठे जोडली जाणार?
13
दस्तनोंदणी दुप्पट; हाताळणी शुल्क ४० रुपये; सरकारला दरमहा मिळतो ४ हजार कोटींचा महसूल
14
राज्यात ‘आनंद गुरुकुल’! सुरू करणार ८ निवासी शाळा, शालेय शिक्षण विभागाचा संकल्प
15
गुरुची विद्या गुरुलाच? ठाकरेंनी आतल्या गोटातून माहिती काढली; भाजपाला शह देण्याची रणनीती आखली
16
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासह लवकरच भारत दौऱ्यावर; टॅरिफच्या गोंधळामध्ये पंतप्रधान मोदींशी घेणार भेट
17
कर्नाटकात मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण मिळणार की नाही? आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठरवणार!
18
भारतीय विद्यार्थ्याने ट्रम्प प्रशासनाविरोधात दाखल केला खटला; अचानक इमिग्रेशन दर्जा रद्द केल्यानंतर कोर्टात धाव
19
भारतीय धावपटूचं शर्यत जिकण्याआधीच सेलीब्रेशन, मागचा पुढं गेला आणि गोल्ड हुकलं!
20
उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”

Maharashtra Gram Panchayat: ज्यांनी गुजरात जिंकवले, ते ग्राम पंचायत हरले; सी.आर.पाटील यांच्या लेकीच्या पॅनलचा पराभव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 11:08 IST

Maharashtra Gram Panchayat Election Result: राज्यातील ७७५१ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे.

जामनेर जि. जळगाव:

राज्यातील ७७५१ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. मतमोजणीचे सुरुवातीचे कलही हाती येऊ लागले आहेत. गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या सी.आर.पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील या जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायद सदस्यपदी विजयी झाल्या आहेत. मात्र त्यांचे ग्रामविकास पॅनल पराभूत झालं आहे. भाविनी पाटील यांच्या ग्रामविकास पॅनलला १० पैकी ३ जागा मिळाल्या आहेत. 

धक्कादायक निकाल! चिमेगावात एकनाथ शिंदे गट- काँग्रेस आघाडीची सत्ता; ठाकरेंना धोबीपछाड

भाविनी पाटील यांचे प्रतिस्पर्धी शरद पाटील यांच्या लोकशाही उन्नती पॅनलला दहा पैकी सात जागा मिळाल्या, त्यात लोकनियुक्त सरपंचपदही शरद पाटलांच्या पॅनलला मिळाले आहे. मोहाडी ग्रामपंचायतच्या निकालाकडे जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून होतं. या ठिकाणी भाजप विरुद्ध भाजप अशी लढत होती. भाविनी पाटील यांच्या पॅनलला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता, परंतु त्यांच्या पॅनलला पराभव पत्करावा लागला आहे.

गुजरात विजयाचं मोदींनी दिलं होतं श्रेयगुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपानं यंदा ऐतिहासिक यश प्राप्त केलं. भाजपानं गुजरात विधानसभेच्या १८२ जागांपैकी तब्बल १५६ जागांवर यश प्राप्त केलं. गुजरातचे निकाल जाहीर होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत सर्वप्रथम गुजराज भाजपा प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. सी.आर.पाटील यांच्या नेतृत्वात भाजपाला गुजरातमध्ये मिळालेल्या यशाबाबत मोदींनी अभिनंदन केलं होतं. 

संभाजीराजे छत्रपतींच्या स्वराज्य संघटनेचा पहिला विजय, या ग्रामपंयातीवर फडकवला झेंडा

सी. आर. पाटील मूळचे जळगावचे. पण, वडील गुजरातमध्ये स्थलांतरित झाले, पाटील यांच्या राजकीय प्रवासही तिथूनच सुरू झाला. पण, त्याआधी ते पोलीस सेवेत होते. सूरतमध्ये पोलिस कॉन्स्टेबल असताना त्यांनी पोलिसांची संघटना तयार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ते निलंबित झाले. त्यांच्यावर दोनदा निलंबनाची कारवाई झाली होती. दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये अवैध दारुविक्रेत्यांशी पाटील यांचे लागेबांधे असल्याचा संशयावरून सूरतच्या पोलिस कृती दलाने त्यांना अटक केली होती. त्यांच्यावर ६ वर्षांच्या निलंबनाची कारवाई केली गेली. पाटील यांनी पोलीस सेवेचा राजीनामा दिला, ते सार्वजनिक जीवनात अधिक सक्रिय झाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत