ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 24 - गजबजलेल्या उमा टॉकीज चौकात पार्वती टॉकीज कडून येणा-या बेधुंद एस. टी. चालकाने चौदा वाहनांना धडकून दोघांना चिरडले. या भिषण अपघातात दोघे जागीच ठार झाले तर सातजण गंभीर जखमी झाले. देवास शामराव घोसारवाडी (वय ४०, रा. कांडगाव, ता. करवीर), सुहास युवराज पाटील (२२, उचगाव, ता. करवीर) अशी मृतांची नावे आहेत. ही ºहदयद्रावक घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
अपघातस्थळी रस्त्यावर ठिकठिकाणी रक्ताचा सडा पडला होता. तर चुराडा झालेली वाहने रस्त्यावर अस्ताव्यस्त पडली होती. दूघटनेनंतर आरडाओरडा, गोंधळ आदी वातावरणामुळे परिसरात हल्लोळ माजला होता. एस. टी. ची टाकी फुटून डिझेल रस्त्यावर पसरले होते. हे विदारक दूष्य अंगावर शहारे आनणारे होते. नागरिकांनी जखमींना तत्काळ मिळेल त्या वाहनाने सीपीआरमध्ये दाखल केले.
जखमीमध्ये एस. टी. चालक रमेश सहदेव कांबळे (४२, रा. कांडगाव, ता. करवीर), पोलीस हावलदार राजाराम भिमराव पाटील (५७, रा. जिवबा नाना पार्क, आपटेनगर), विक्रम विठ्ठल घोरपडे (३३, रा. पाचगाव, ता. करवीर), बाबुराव केशव वडणगेकर (६१, रा. शाहुपूरी, कुंभार गल्ली), सतिश कृष्णात पाटील (२०, रा. मुटकेश्वर, ता. गगनबावडा), प्रतिभा योगेश नाळे (२८, रा. सांगरुळ, ता. करवीर), राजाका गुलाब लोखंडे (४०, रा. वाशी, ता. करवीर),श्रीपती ईश्वर रवळकर (४७), पांडूरंग गुंडू पाटील (५०, दोघे रा. दोनवडे, ता. करवीर ) आदींचा समावेश आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सीपीआरला भेट देवून जखमींची विचारपूस केली.
अधिक माहिती अशी, हूपरीहून रंकाळा बसस्थानकाकडे एस. टी. बस ३५ प्रवासी घेवून (एम. एच. १४, बी. टी. १५३२) येत होती. सायंकाळी सहाच्या सुमारास पार्वती टॉकीजकडून ती उमा टॉकीजच्या दिशेने आली. यावेळी चौकातील सिग्नल लागल्याने या मार्गावरील वाहने थांबून होती. बेधूंद चालक रमेश कांबळे याला एस. टी. थांबविता आली नाही. त्याने थेट समोरील एकापाठोपाठ चौदा वाहनांना धडकून दोघाजणांना चिरडले. त्यानंतर आझाद चौकाकडे जाणाºया कोप-यावरील विद्युत खांबाला बस धडकून थांबली. बसखाली चिरडून देवास घोसारवाडी व सुहास पाटील या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर धडकेमध्ये दोन महिलांसह आठजण गंभीर जखमी होवून रस्त्यावर विव्हळत पडले. कुणाच्या डोक्याला, तर छातीला, हाता-पायांना गंभीर दूखापती झाल्या होत्या. रस्त्यावर ठिकठिकाणी रक्ताचा सडा पडला होता. दूघटनेनंतर आरडाओरडा, गोंधळ आदी वातावरणामुळे परिसरात हल्लोळ माजला होता. बस चालक कांबळे हा स्टेरिंगवर बेशुध्दावस्थेत पडला होता. नागरिकांनी त्याच्यासह इतर जखमींना मिळेल त्या वाहनांनी सीपीआरमध्ये दाखल केले. एस. टी. च्या धडकेत वाहने रस्त्यावर अस्तावस्त पडली होती. बसची टाकी फुटून डिझेल रस्त्यावर विखुरले होते. हे विदारक दूष्य अंगावर शहारे आनणारे होते. घटनेचे वृत्त पोलीसांना समजताच शहरातील चारही पोलीस ठाण्याचे निरीक्षक, कर्मचारी, अग्निशामक दलाचे जवाण, रुग्णवाहीका घटनास्थळी आल्या. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने या मार्गावरील चारही बाजूची वाहतूक बंद केली. सुमारे दोन तपासांच्या प्रयत्नानंतर रस्त्यावरील एस. टी. बससह अन्य अपघातग्रस्त वाहने हलविण्यात पोलीसांना यश आले. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी भेट दिली.
सीपीआरमध्ये अक्रोश -
एस. टी. अपघातातील जखमींना सीपीआरमध्ये दाखल केल्याने डॉक्टरांची धांदल उडाली. अपघाताचे वृत्त समजेल तसे नातेवाईकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली. सुहास पाटीलचा मृतदेह अपघात विभागात झाकुन ठेवला होता. देवास घोसारवाडी हे देखील घरी कांडगावला निघाले असताना त्यांच्या छातीवरुन बसचे चाक गेल्याने मृत्यू झाला. या दोघांच्या नातेवाईकांनी केलेला अक्रोश रहद्य पिळवटून टाकणारा होता. सुहास हा अभियंता होता. मुटकेश्वर (ता. गगनबावडा) हे त्यांचे मूळ गाव. येथील मित्र सतिश पाटील हा घरी आल्याने त्याचेसोबत गावी जावून येतो म्हणून तो घरातून बाहेर पडला होता.
चालकाचे कारण अस्पष्ट -
एस. टी. चालकाला -हदय विकाराचा धक्का येवून बेशुध्द पडल्याने अपघात झाल्याचे वृत्त शहरात पसरले. बेशुध्द बस चालक रमेश कांबळे याला तत्काळ सीपीआरमध्ये आणले. वाटेतच तो शुध्दीवर आला होता. डॉक्टरांनी त्याची वैद्यकीय तपासणी करुन सीपीआरच्या पोलीस चौकीत पाठवून दिले. त्यामुळे त्यांना -हदय विकाराचा धक्का आला की नाही हे स्पष्ट होत नव्हते. पोलिसांनी अपघातासंबधी चौकशी केली असता मला काही माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. अडखळत बोलत असल्याने चालकाने मद्यसेवन केल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली. परंतू काही वेळाने त्याला अतिदक्षता विभागात दाखल केले. रात्री उशीरापर्यंत त्याला नेमके काय झाले होते हे स्पष्ट झाले नाही.