शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

वृक्षलागवडीसाठी स्वतंत्र ‘पॅटर्न’ तयार करणार

By admin | Published: May 30, 2017 3:10 AM

वृक्षलागवड कार्यक्रमामधून बिहारच्या धर्तीवर राज्याचा स्वतंत्र ‘पॅटर्न’ तयार करण्यात येणार आहे. रेल्वेच्या जागांवर वृक्षलागवड

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : वृक्षलागवड कार्यक्रमामधून बिहारच्या धर्तीवर राज्याचा स्वतंत्र ‘पॅटर्न’ तयार करण्यात येणार आहे. रेल्वेच्या जागांवर वृक्षलागवड करण्यासाठी राज्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून, रेल्वे प्रशासनासोबत त्याबाबत बोलणी सुरू आहेत. राज्यामध्ये रेल्वेच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून रेल्वेसोबत एक वर्षाचा करार झाल्याची माहिती वित्त, नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. मुनगंटीवार यांनी विधान भवनामध्ये पुणे महसूल विभागाची वृक्षलागवड कार्यक्रमासंदर्भात तयारीची आढावा बैठक घेतली. या बैठकीला वनविभागाचे सचिव, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, आमदार दत्तात्रय भरणे, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, डॉ. नीलम गोऱ्हे, शरद रणपिसे यांच्यासह पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, सोलापूरचे जिल्हाधिकारी, पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार, उपवन संरक्षक रंगनाथ नाईकडे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. राज्यामध्ये १ ते ७ जुलैदरम्यान चार कोटी वृक्षलागवड कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीची सर्व माहिती संकेतस्थळावर टाकली जात असून, आजमितीस ४१ लाख २६ हजार खड्डे तयार आहेत. १ कोटी ८७ लाख रोपे तयार असल्याचे त्यांनी सांगितले. निरोगी वृक्ष लागवडीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असून वनविभागाने गेल्या वर्षी लागवड केलेल्या वृक्षांच्या जगण्याचे प्रमाण ८५ टक्के तर अन्य विभागांचे प्रमाण ७५ टक्के आहे. पुणे जिल्ह्यातील रेल्वेच्या जागांवर २ हजार, मोहोळला ६ हजार ६६६, कुर्डूवाडीमध्ये १ हजार ५५५ वृक्ष लावण्यात येणार आहेत. वनविभागातर्फे माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी हॅलो फॉरेस्ट १९२६ या नि:शुल्क सेवेची सुरुवात करण्यात आली असून, ही देशातील पहिली हेल्पलाईन आहे. यासोबतच रोप आपल्या दारी उपक्रम राबवण्यात येत आहे. हरीत सेनेच्या माध्यमातून १ कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट असून आतापर्यंत २५ लाख नोंदणी झाली आहे. संगणकीय प्रणालीचा अधिकाधिक वापर करण्यात येत आहे. पारदर्शकता ठेवण्यासोबतच नागरिकांमधील नकारात्मकता कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी विभागवार बैठका घेण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मनरेगाच्या माध्यमातून एक कुटुंब एक हजार झाडे असा प्रकल्प राबवणार आहे. आगामी काळात वनयुक्त शिवार हा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. राज्यभरात वनविभागाच्या जागांवर भिंतींचे कुंपण घालण्यात येत आहे. या वेळी वनविभागाचे सचिव विकास खारगे, वनविभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) श्री भगवान, प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण अनुराग चौधरी, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण डॉ. दिनेशचंद्र त्यागी, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) पुणे विवेक खांडेकर, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते. प्रारंभी संत तुकाराम वनग्राम योजने अंतर्गत पुणे जिल्हास्तरावरील पुरस्काराचे वितरण करण्यात आले. वनसंरक्षण समिती घेरासिंहगड यांना प्रथम, तर वन संरक्षण समिती सांडभोरवाडी,खेड यांना व्दितीय क्रमांकाचे अनुक्रमे ५१ हजार व ३१ हजार रुपयांचे पारितोषिक वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.लातूरमध्ये केवळ एक टक्काच वनक्षेत्र आहे. संरक्षण विभागासोबत करार करण्यात आला असून लातूरमध्ये त्यांच्या जागांवर वृक्षांची लागवड आणि संवर्धन केले जाणार आहे. वृक्ष स्वत:चे पोषण करु शकतील एवढी वाढ होईपर्यंत शासनामार्फत वाढवले जाणार आहेत. इको बटालियनच्या माध्यमातून लातूरमध्ये वनक्षेत्र वाढवण्यावर भर देणार आहे.ट्री क्रेडिटवर काम सुरु असून त्यासाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल आलेला आहे. कायद्यामध्ये काही प्रमाणात बदल करावा लागणार आहे. आगामी काळात ट्री क्रेडिटसंदर्भात निर्णय घेतला जाईल.मुंबईजवळील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, जुन्नरसह चंद्रपूरमध्ये बिबट्या सफारी सुरु करण्यात येणार आहे. राज्यामध्ये वर्षाला ४५ वाघ किंवा बिबट्या मृत्युमुखी पडत होते. ते प्रमाण आता २५ वर आणण्यात यश आले आहे.