वाशिम: जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले भाजपा प्रदेश उपाध्यक्ष किरिट सोमय्या हे शुक्रवार २० ऑगस्ट रोजी देगाव येथे जात असताना त्यांचे वाहन अडवून गैरकायद्द्याची मंडळी जमा करीत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी, वाहनावर दगडफेक, शाईफेक केल्याप्रकरणी २६ शिवसैनिकांसह ३०० जणांवर कामात अडथळा आणल्याप्रकरणी भाजपाच्या ४ कार्यकत्र्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र गवळी यांच्या तक्रारीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले.भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या हे २० ऑगस्ट रोजी नियोजीत वाशिम जिल्हा दौऱ्यावर आले असता पोलीस अधीक्षक, वाशिम यांचे आदेशनुसार पोलीस बंदोबस्त वरील अधिकारी व पोलीस अमलदार यांना ब्रीफींग करून देगाव येथे बंदोबस्त लावण्यात आला होता. बंदोबस्तासाठी ठाणेदार सोमनाथ जाधव यांच्यासह जवळपास ४५ ते ५० पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्यावेळी शिवसैनिक देगाव फाटा येथे एकत्र जमा झाले होते. बालाजी पार्टीकल बोर्ड गेट समोर पुरुष आणि महिला मिळून ३०० शिवसैनिक जमा झाले होते. व्हीआयपी ताफा बालाजी पार्टीकल बोर्डाजवळ पोहचण्यापूर्वी बंदोबस्तावर असलेले पोलीस तेथे पोहचले. त्यानंतर व्हीआयपी ताफा बालाजी पार्टीकल बोर्ड येथे पोहोचला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी राजू पाटील राजे यांना एम एच ३७ व्ही १९२० क्रमांकाचे वाहन वारंवार सुचना देऊनही त्यांनी व्हीआयपी वाहनासमोर ठेवले व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राजेसह ४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच येथे जमलेल्या शिवसैनिकांसह जमावातील काही लोकांनी साेमय्या यांच्या वाहनावर शाई व दगड फेक करीत किरीट सोमया व भाजपा यांचेविरोधात जोर-जोरात घोषणाबाजी केली. त्यावरून बंदोबस्तावर तैनात अधिकारी व कर्मचारी यांनी जमाव पांगविला. तसेच महादेव नारायण ठाकरे रा मांगुळ झनक, अरूण प्रल्हाद मगर रा रिसोड, पवन ईरकतर शहर उपाध्यक्ष मालेगाव, भारत प्रभाकर गवळी रा एकलसपुर, संतोष बळी रा मालेगाव, परमेश्वर भिमराव कांबळे रा कवठा आदि मिळून २६ शिवसैनिकांसह जवळपास ३०० लाेकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमाव बंदी आदेशाचे व कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी त्यांच्यावर १४३, १४७,१४८,१४९,३३६,१८८,२६९,भादंवि सहकलम १३५,१४० महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी २६ शिवसैनिकांसह ३०० जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 9:13 PM