ऑनलाइन टीम
ठाणे, दि. १०- कळवा येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील ३० विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करणा-या प्राध्यापकावर अखेर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलेश्वर नटराजन असे या प्राध्यापकाचे नाव असून त्याला कळवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारित येणा-या कळवा येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक शैलेश्वर नटराजन यांच्याविरोधात काही विद्यार्थिनींनी लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. मात्र या तक्रारींकडे पोलिस, महापालिका व रुग्णालय प्रशासनाने गांभीर्याने बघितले नाही असा आरोप विद्यार्थिनींनी केला होता. हा प्रकार प्रसारमाध्यमांमध्ये आल्यावर पोलिसांनी याप्रकरणी नटराजनविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी नटराजनला ताब्यात घेतले आहे.