शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
2
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
3
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
4
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
5
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
6
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
7
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
8
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
9
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
10
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
11
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
12
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
13
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
14
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
15
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
16
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
17
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
18
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
19
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
20
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली

रमेश पाटील व त्यांच्या दोन भावांवर गुन्हा

By admin | Published: December 23, 2016 4:56 AM

काटई येथील शिवसेनेचे कार्यकर्ते तथा बांधकाम व्यावसायिक अमित पाटील यांचे अंगरक्षक विकी ऊर्फ विवेक शर्मा (३९) यांच्या

डोंबिवली : काटई येथील शिवसेनेचे कार्यकर्ते तथा बांधकाम व्यावसायिक अमित पाटील यांचे अंगरक्षक विकी ऊर्फ विवेक शर्मा (३९) यांच्या हत्येसंदर्भात माजी आमदार रमेश पाटील, मनसेचे सचिव राजू पाटील व त्यांचे बंधू विनोद पाटील यांच्याविरोधात संशयित आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना लागलीच अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीकरिता शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी मानपाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा नेण्यात आला. संतप्त शिवसैनिकांनी रुग्णवाहिकेतून विवेकचा मृतदेह सोबत आणला होता. तब्बल तीन तास शिवसैनिकांनी आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिल्यावर विवेकवर अंत्यसंस्कार केले.बुधवारी दुपारी दोन अनोळखी मारेकऱ्यांनी अमित पाटील समजून केलेल्या गोळीबारात अंगरक्षक विवेकचा मृत्यू झाला, असा पाटील यांचा दावा आहे. यासंदर्भात पोलिसांनी रमेश पाटील, राजू पाटील व विनोद पाटील यांच्यावर संशयित आरोपी म्हणून गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीकरिता खासदार डॉ. शिंदे, आमदार सुभाष भोईर, बालाजी किणीकर, महापौर राजेंद्र देवळेकर, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, सभागृह नेते राजेश मोरे, शहरप्रमुख विद्याधर भोईर यांच्यासह नगरसेवक व शेकडो शिवसैनिकांनी गुरुवारी सकाळी मानपाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. (प्रतिनिधी)